CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Panchayati Raj Day : जिल्हा विकास पंचायत आराखडा तयार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

पंचायतराज दिनी या आराखड्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : उत्तर गोवा जिल्‍ह्यातील पंचायतींनी पाठविलेल्या विविध कामांबाबत केलेल्या सूचनांना मंजुरी देऊन त्यांचा जिल्हा विकास पंचायत आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. येत्या २५ रोजी पंचायतराज दिनी या आराखड्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

या आराखड्यात कचरा तसेच रस्त्यावरील भटक्या गुरांच्या समस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने मंजूर केलेल्या निधीमधून तसेच अधिक निधी लागल्यास ती तरतूद संबंधित खात्याच्या मदतीने केली जाईल, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक यांनी दिली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्यांची आज विशेष बैठक बोलविण्यात आली होती. यात उत्तर गोव्यातील पंचायती, शेतकरी क्लब तसेच युवा क्लबकडून त्यांच्या समस्यांबाबतच्या अालेल्या सूचनांवर या बैठकीत चर्चा झाली.

यापूर्वी सरकारने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ८ कोटी अर्थसंकल्पात मंजूर केले होते. त्यात यावर्षी वाढ करून १२.५० कोटी रुपये केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये सुमारे ५० लाखांच्या निधीची कामे केली जाणार आहेत. - सिद्धेश नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT