Sancoale Panchayat Dainik Gomantak
गोवा

Sancoale Dispute: ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांकवाळच्या पंचास धक्काबुक्की! आमदार वाझ यांच्या समक्ष घडली घटना

Sancoale Panchayat: सांकवाळ येथे इंडियन ऑईल टॅंकीगसमोर असलेल्या एमआरएफ या कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: पंचायत कचरा पर्यवेक्षक सलीम याने सांकवाळ ग्रामपंचायतीचे विरोधी पंच सदस्य तुळशीदास नाईक यांना कुठ्ठाळीचे आमदार आणि सांकवाळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत धक्काबुक्की केली. सलीम याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सांकवाळ येथे इंडियन ऑईल टॅंकीगसमोर असलेल्या एमआरएफ या कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला. ही घटना आज दुपारी दोन वाजता कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांच्या समक्ष घडली. या कचरा संकलन केंद्रात कुठ्ठाळी सांकवाळ भागातील सोडून बाहेरचा कचरा आणून टाकत असल्याच्या तक्रारी होत्या.

याविषयी आज पंच सदस्य तुळशीदास नाईक यांनी हा प्रकार कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांच्या समक्ष उघड केला. यावेळी सलीम व तुळशीदास नाईक यांच्यात बाचाबाची झाली व सलीम याने तुळशीदास नाईक यांना ढकलून दिले व अंगावर धावून गेला. यावेळी आमदार वाझ यांनी मध्यस्थी करून दोघांना दूर केले.

दरम्यान, याविषयी तुळशीदास नाईक यांनी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून संशयित सलीम सध्या फरारी आहे.

भाजपचे कार्यकर्तेही सुरक्षित नाहीत; अमित पाटकर

गोव्यात भाजप सरकारला पाठिंबा देणारे कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वाझ यांच्या उपस्थितीत सांकवाळ येथे भाजपच्या राजवटीत गुंडा राज सुरू आहे आणि पोलिस अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. एक कचरा पर्यवेक्षक पंच सदस्यास मारहाण करण्याची उघडपणे धमकी देत ​​आहे. यावरून गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्ण अपयश उघड होत आहे. भाजपचे कार्यकर्तेही आता सुरक्षित नाहीत हे स्पष्ट आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT