Panaji Smart City Budget Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: पणजी स्‍मार्ट सिटीबाबत मोठी बातमी! आतापर्यंत 1043 कोटी रुपये खर्च; अजून 8 कोटी लागणार

Pananji Smart City Budget: पणजी स्‍मार्ट सिटी मिशनअंतर्गत ५१ पैकी ५० प्रकल्‍प पूर्ण झाले असून, त्‍यावर आतापर्यंत १,०४३ कोटी रुपये खर्च केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी स्‍मार्ट सिटी मिशनअंतर्गत ५१ पैकी ५० प्रकल्‍प पूर्ण झाले असून, त्‍यावर आतापर्यंत १,०४३ कोटी रुपये खर्च केले आहेत. एका प्रकल्‍पाचे काम अद्याप सुरू असून, त्‍यासाठी आठ कोटींचा खर्च येणार असल्‍याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहारमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

स्‍मार्ट सिटी मिशनअंतर्गत गोव्‍यासह विविध राज्‍यांतील निश्‍चित केलेल्या शहरांमध्ये १,६४,८११ कोटी रुपये खर्चाचे एकूण ८,०६४ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी १,५५,८५९ कोटींचे ७,७६७ प्रकल्प पूर्ण झाले असून, प्रस्‍तावित प्रकल्‍पांपैकी २९७ प्रकल्पांचे काम सध्‍या सुरू आहे. त्‍यावर ८,९५२ कोटी खर्च करण्‍यात येणार आहेत.

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण केंद्रे

स्‍मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरांचा विकास साधताना गुन्हेगारीला आळा घालण्‍यासाठी निरीक्षण, नागरिकांच्‍या सुरक्षेसह वाहतूक, कचरा, पाणी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी नियंत्रण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. शहरांमधील वारसा स्थळांचे संवर्धन करण्‍यासह बाजारपेठांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. पाणी गळती आणि चोरी रोखण्‍यासाठी आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना केल्‍या जात आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT