Panaji Crime  Gomantak Digital Team
गोवा

Panaji Crime Case : सुमित मृत्यूप्रकरणातील संशयित फरारी

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Crime Case : कामराभाट येथील सुमित मेगेरी याच्या मृत्यूप्रकरणातील आगशीचा संशयित मायरॉन फर्नांडिस व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. संशयितांच्या घरी त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून ते घरीच आले नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे त्यांचा शोध चालवला आहे.

संशयितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याने घाबरूनच ते पसार झाले असावेत, असे मत तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. ज्या दिवशी सुमित मेगेरी याला संशयितांनी मारहाण केली होती, त्याची व्हिडिओ क्लीप पोलिसांना देण्यात आली आहे.

त्याआधारे पोलिस अधिक माहिती जमवत आहेत. संशयितांनी त्यांचे मोबाईल फोन बंद ठेवले वा सिमकार्ड बदलले असण्याची शक्यता आहे. संशयितांच्या घरावर पाळत ठेवली आहे. कामराभाटवासीयांनी हे प्रकरण लावून धरल्याने पोलिसांवर दडपण आले आहे.

सुमित मेगेरी याला फेब्रुवारीत संशयितांनी रस्त्यामध्ये अडवून त्याला बेदम मारहाण केली होती. जमिनीवर पाडून डोक्यावर लाथा मारल्या होत्या. डोक्याला किरकोळ जखम झाली होती, मात्र डोक्याच्या आत झालेल्या जखमा दोन महिन्यानंतर अधिक तीव्र झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या डोक्याचे स्कॅनिंग केले नव्हते त्यामुळे मेंदूला झालेल्या जखमा तेव्हा दिसल्या नव्हत्या. गोमेकॉतील डॉक्टरांनी किरकोळ जखमा असा अहवाल दिल्याने पणजी पोलिसांनी त्याआधारे अदखलपात्र गुन्हा नोंदला होता. त्यावेळी मेगेरी याने अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

मृत्यूला कारण मारहाण?

मारहाण झाल्यापासून मेगेरी याचे डोके अधूनमधून दुखत होते. त्याने डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी केली नव्हती. त्यानंतर त्याला ताप आला होता. उपचार सुरू असतानाच त्याचे इस्पितळात निधन झाले होते. त्याच्या मृत्यूला फेब्रुवारीत त्याला झालेली मारहाण कारण असल्याचा दावा करून कामराभाटच्या रहिवाशांनी या प्रकरणाच्या चौकशीची विनंती केली होती.

त्यानुसार पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी ‘गोमेकॉ’कडून शवचिकित्सा अहवाल घेतला. त्यात त्याचा मृत्यू मेंदूतील जबर जखमेमुळे झाल्याचे नमूद केले होते. ही जखम दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीची असू शकते, असेही त्यात निष्पन्न झाल्याने मारहाण करणाऱ्यांविरुद्ध 304 (अ) खाली गुन्हा दाखल झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT