BJP in Sanquelim: साखळी नगराध्यक्षपदी रश्मी, तर उपनगराध्यक्षपदी आनंद?

अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा नाही : आज अर्ज दाखल करण्यासाठी मुदत
BJP
BJPGomantak Digital Team
Published on
Updated on

BJP in Sanquelim : भाजपकडून साखळी नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात आल्यानंतर आता या नगरपालिकेवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून कोण विराजमान होणार याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मंगळवार, १६ रोजी सकाळी नवनिर्वाचित नगरसेवकांना शपथग्रहण व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

त्यासाठी सोमवार 15 रोजी या दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर साखळी नगरपालिकेवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून कोण बसणार, हा विषय अजूनही तसा चर्चेतच आहे.

कारण अद्याप भाजपतर्फे या दोन्ही पदांसाठी कोणत्या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते जाहीर करण्यात आलेले नाही;

BJP
Margao News: कोकणी हौशी नाट्यस्पर्धेत 'या' नाटकाने मारली प्रथम क्रमांकाची बाजी

परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्षपदासाठी अनुभवी व ज्येष्ठ नगरसेविका तथा धर्मेश सगलानी यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या रश्मी देसाई यांची सर्वप्रथम वर्णी निश्चित झाली आहे.

तर उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते व दुसऱ्या वेळी निवडून आलेले आनंद काणेकर यांची निवड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.

साखळीची नगरपालिका निवडणूक ही यावेळी बरीच लक्षवेधी व प्रतिष्ठेची होती. तर निकालही तसा लक्षवेधीच व धक्कादायक ठरला.

भाजपने मतदान झालेल्या सर्व दहाही प्रभागांमध्ये निर्विवाद वर्चस्व राखत ही नगरपालिका एकहाती आपल्याकडे खेचून आणली. बारा सदस्यीय या नगरपालिकेवर एक बिनविरोध व दहा उमेदवार मतदानातून निवडून आणत भाजपने अकरा नगरसेवक निवडून आणले.

BJP
Ada Sharma Accident: हिंदू एकता यात्रेला जात असताना अदा शर्मा आणि सुदीप्तो सेन यांचा अपघात!

पदे वाटून दिली जातील?

या नगरपालिकेत 12 पैकी11 प्रभागांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे. या 11 मध्ये 6 महिला तर 5 पुरुष नगरसेवक आहेत.

नगराध्यक्षपद महिलांसाठी तर उपनगराध्यक्षपद खुले आहे. नगराध्यक्षपदी सर्वप्रथम रश्मी देसाई यांची निवड झाली तर उर्वरित ५ महिला नगरसेविकांमध्ये नगराध्यक्षपद पाचही वर्षांसाठी वाटून दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षपदही पाच पुरुष नगरसेवकांमध्ये 5 वर्षांसाठी वाटून दिले जाणार आहे. सर्व अकराही नगरसेवकांना या पालिका मंडळात समान संधी व न्याय मिळवून देण्याचे नियोजन भाजपतर्फे करण्यात आले आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

BJP
Sun Tan Reduction: त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी लावा या घरगुती गोष्टी

रश्मी देसाई ‘जायंट किलर’!

या निकालात सर्वात लक्षवेधी लढत होती ती प्रभाग 4 मधील. त्यात रश्मी देसाई यांनी धर्मेश सगलानी यांचा पाडाव केला.

त्यामुळे या नगरपालिकेत रश्मी या जायंट किलर ठरल्या होत्या. यावेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे, त्यामुळे रश्मी यांनाच सर्वप्रथम नगराध्यक्षपदाचा मान मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com