Goa Youth Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Panjim Youth Festival: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा १ ते २ डिसेंबर राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कला अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहे. उद्‍घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार असल्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

गोवा छायापत्रकार संघटनेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाचे संचालक डॉ. अजय गावडे उपस्थित होते.

तवडकर यांनी सांगितले की, या महोत्सवादरम्यान लोककला, लोकगीत, पेंटींग, कविता लेखन, कथा लेखन, छायाचित्रण आणि रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

या स्पर्धांमध्ये राज्यातील तरुणाईने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपल्या कला सादर करावी. जे या स्पर्धांमध्ये अव्वल येतील त्यांना राष्ट्रीय स्तरावर १० ते १२ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनीसांगितले.

१० हजार तरुण सहभागी होणार

यंदा युवा महोत्सवाचे स्वरूप बदलण्यात आले असून विकसित भारताचे युवा नेतृत्व संवाद असे नामकरण करण्यात आले आहेत. हा युवा महोत्सव प्रामुख्याने संस्कृती, विज्ञान महोत्सव आणि विकसित भारत चॅलेंज ट्रॅक अशा तीन विषयांवर आधारित असणार आहेत.

यंदा पहिल्यांदा मराठी आणि कोकणीतून कविता आणि कथा लेखन स्पर्धेचे राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख २८ नोव्हेंबर असून सुमारे १० हजार तरुण या महोत्सवात सहभागी होणार असल्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT