Panaji Football Ground Dainik Gomantak
गोवा

Panaji Football Ground: राजधानीला मिळणार दर्जेदार फुटबॉल मैदान; 40 टक्के काम पूर्ण

कांपाल परेड मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू

दैनिक गोमन्तक

Panaji Football Ground: कांपाल येथील बांदोडकर मैदानावर फुटबॉलचे सामने बंद झाले आणि पणजी व परिसरातील अनेक फुटबॉलपटूंची गैरसोय होऊ लागली. ताळगावात फुटबॉल मैदान असले तरी तेथे मोठे सामने किंवा स्पर्धा घेण्यासाठी मर्यादा येतात.

मात्र आता पणजीवासीयांचे फुटबॉल मैदानाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे. कांपाल येथील परेड मैदानावर फुटबॉल मैदान उभारण्‍याचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित ६० टक्के काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार असल्‍याचे कंत्राटदार कंपनीच्‍या अभियंत्‍याने सांगितले.

सदर मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नैसर्गिकरित्या गवत उगवून टर्फची निर्मिती करण्यात आली आहे. ‘इमॅजिन पणजी-स्मार्ट सिटी’ विकास महामंडळाचा हा उपक्रम असून, नगरविकास प्राधिकरणाच्या मदतीने तो पुढे नेण्यात येत आहे. महापालिकेने या मैदानावर टाकलेला कचरा हटविण्यात आला.

मैदानाच्या चोहोबाजूला हायमास्टचे दिवे असतील. पणजीच्या वैभवात हे मैदान भर घालेल, अशी रचना करण्‍यात येत आहे. एक-दोन दिवसाआड जिल्हाधिकारी स्वतः या मैदानाच्या कामाची पाहणी करतात, अशी माहिती त्‍या अभियंत्‍याने दिली.

दीड हजार लोकांची आसनक्षमता

या फुटबॉल मैदानावर सध्या प्रेक्षक गॅलरीचे काम सुरू आहे. सुमारे दीड हजार प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेची गॅलरी उभारली जात आहे. गॅलरीच्या खालील बाजूस तळमजल्यावर पॅव्हेलियन, रेस्टॉरंट, चेजिंग रूम असेल.

शिवाय मैदानाच्या डाव्या बाजूला व्यायामशाळा असणार आहे. स्टेडियमच्या मागील बाजूस पार्किंगची सोय तर बांदोडकर मार्गाच्या बाजूला वृक्षारोपण, बालभवनाच्या समोरील मैदानावरील जागेत हरित आच्छादन असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT