Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy : आम्हाला कला अकादमी पूर्ववत हवी : सडेतोड नायक

Kala Academy : नाट्यकलाकारांशी संवाद, अकादमीची अवस्था पाहून दु:ख व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy :

पणजी, कला अकादमी ही माझ्यासाठी आई आहे. तिने मला घडविले, नाव दिले, कलाकार म्हणून ओळख दिली. परंतु नूतनीकरणाच्या नावाखाली तिची केलेली अवस्था पाहिली की दुःख होते.

आम्हाला राजकारण्यांकडून काहीही अपेक्षा नाहीत केवळ आमची कला अकादमी आम्हाला पूर्वी जशी होती तशीच हवी आहे, अशा भावना ज्येष्ठ नाट्यकलाकार देविदास आमोणकर यांनी व्यक्त केल्या. ते गोमन्तक टिव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात बोलत होते. संपादक संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमात नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनीही सहभाग घेतला.

आमोणकर म्हणाले, आम्ही आपले ज्यावेळी घर बांधतो, त्यावेळी आपण त्याचे पूर्वनियोजन करतो. बारीक सारीक गोष्टीही तपासतो परंतु कला अकादमीचे नूतनीकरण करताना या कामांची काळजी घेतली गेलेली नाही.

कला अकादमी हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपणे कलाकारांचेच नव्हे तर आम्हा साऱ्यांचे कर्तव्य आहे.

कलाकारही तितकेच जबाबदार

कला अकादमीची ही स्थिती व्हायला आम्ही कलाकार देखील तेवढेच जबाबदार आहोत कारण आपण कोणा विरोधात बोललो तर आपल्याला त्याचे फळ भोगावे लागेल असे आम्हाला वाटते परंतु आता आम्ही एकत्र येऊन आवाज उठविणे गरजेचे असून त्याअनुषंगाने आम्ही पाऊले टाकत असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले.

नूतनीकरणाच्या नावाखाली साैंदर्य नष्ट

कला अकादमीशी गोमंतकातील प्रत्येक कलाकाराचे भावनिक नाते आहे. ते आमच्यासाठी मंदिर आहे परंतु नूतनीकरणाच्या नावाखाली कला अकादमीचे सौंदर्य नष्ट करून टाकले. कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे स्वतः एक कलाकार असून ते एक कलाकार मंत्रीपदी असताना अशा गोष्टी घडणे अपेक्षित नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी गोमंतकीय कलाकार, सिनेमासाठी किमान एक गोष्ट केली असेल तर दाखवावी. मुख्यमंत्रांनी कलाकारांसाठी काहीच केले नसल्याचा आरोप राजदीप नाईक यांनी केला.

हे एक षडयंत्र...

कला अकादमीचे योग्य नूतनीकरण न करण्यात षडयंत्राचा वास येत आहे. सरकारला कदाचित सांस्कृतिक केंद्र बदलायची ईच्छा झाली असावी. साखळी, फोंडा, वाळपई भागात स्पर्धेचे नाटके करावी असे त्यांना वाटत आहे. तेथील रवींद्र भवन, राजीव गांधी कलामंदिर सुस्थितीत आणि कला अकादमीची दैन्यावस्था पहावत नसल्याचे देविदास आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

SCROLL FOR NEXT