Vehicle Dainik Gomantak
गोवा

Vehicle Purchase : गेल्या चार वर्षांत राज्यात वाहन खरेदी दुप्पट; यावर्षी आतापर्यंत २७,६७५ वाहनांची नोंदणी

गोमन्तक डिजिटल टीम

Vehicle Purchase :

पणजी, एखाद्या शुभमुहुर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी लोकांची नेहमी धावपळ असते. यंदाही गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर ऑनलाइन तसेच वाहतूक खात्याच्या कार्यालयातून ६३८ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण किंचित कमी आहे. वाहनांच्या किमती वाढल्या तरी वाहन खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चार वर्षात दुपटीने वाहन नोंदणी झाली आहे, अशी माहिती खात्याचे वाहतूक उपसंचालक बी. सावंत यांनी दिली.

गेल्या वर्षी गुढीपाडव्यादिनी वाहने खरेदी केलेल्यांची संख्या ६२५ च्या आसपास होती. अनेकदा काहीजण गुढीपाडव्याच्या दिवशी वाहतूक खात्याला सुट्टी असल्यास आदल्या दिवशी वाहन नोंदणी करून दुसऱ्या दिवशी वाहने खरेदी करतात तर काहीजण थेट वाहन डीलर्सकडून वाहने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून वाहन खरेदी करतात.

डीलर्सकडून नोंदणीवेळी ऑनलाईनमध्ये त्या दिवशी कनेक्शन समस्या येऊ नये म्हणून ही आदल्या दिवशी नोंदणी केली जाते, असे सावंत यांनी यांनी स्पष्टीकरण केले.

यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी सुमारे २०२ वाहनांची नोंदणी झाली.

राज्यात १२, ८९, ५१० वाहने

राज्यात २४ एप्रिल २०२४ पर्यंत १२ लाख ८९ हजार ५१० वाहनांची नोंदणी झालेली आहे. वाहनांच्या किमती वाढल्या असल्या तरी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आतापर्यंत २७ हजार ६७५ वाहने नोंदणी झाली आहे.

दरवर्षी ही नोंदणी वाढतच आहे. २०२० मध्ये ४२,४३५ वाहनांची खरेदी झाली ती मात्र २०२३ मध्ये खरेदी वाहनांची संख्या ८१ हजार ३१८ झाली होती. म्हणजेच गेल्या चार वर्षात दुपटीने वाहने खरेदी झाली आहेत.

८ लाख २० हजार दुचाकी :

वाहतूक खात्याकडे ८ लाख २० हजार दुचाकी वाहने आहेत तर ३ लाख ३५ हजार चारचाकी वाहने आहेत. मोटारसायकल पायलट वाहने २७,२२९, माल वाहतूक ५५,५४७ वाहने, टॅक्सी ३३,८१५. मॅक्सी कॅब २८३२, बसेस व ओम्नी बसेस ६१३५ तर ट्रॅक्टर्स व इतर ७३८ वाहने नोंद आहेत.

महसूलही दुप्पट

वाहन शुल्क तसेच परमिट व वाहन परवाना नूतनीकरणामधून वाहतूक खात्याच्या महसुलात दरवर्षी वाढ होत आहे. या शुल्कामध्ये वाढ करण्यात येत असल्याने गेल्या ४ वर्षात हा महसूल दुप्पट झाला आहे. २०२० मध्ये खात्याचा महसूल सुमारे १६२.२७ कोटी होता तो २०२३ पर्यंत ३९८.१९ कोटींवर पोचला आहे. या वर्षी आतापर्यंत १३९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वाहनासाठी चॉईस क्रमांकासाठी शुल्क वाढवण्यात आले असल्याने पूर्वीसारखा प्रतिसाद नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT