Goa Politics: 'पंतप्रधानांनी संविधानाची हत्या केली, तारीख, वेळ ठरवा मी चर्चेला तयार'; विरियातोंचे मोदींना 'ओपन चॅलेंज'

Captain Viriato Fernandes Vs PM Modi: देशाबद्दल खरच प्रेम असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना सेनादलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन का देत नाहीत? सेनादलात सैनिकांची कमतरता असल्याचा दावा विरियातो यांनी यावेळी केला.
Captain Viriato Fernandes Vs PM Modi
Captain Viriato Fernandes Vs PM ModiDainik Gomantak

Captain Viriato Fernandes Vs PM Modi

विरियातो फर्नांडिस यांच्या संविधानाबाबतच्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत हा डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले. विरियातो यांनी मोदींना याबाबत चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तारीख, वेळ आणि ठिकाण निश्चित करावे मी चर्चेला हजर राहतो, असे विरियातो म्हणाले.

गोमन्तकीय सामना करत असलेल्या इतर समस्यांचे काय? भाजपने गोमन्तकीयांना दिलेल्या आश्वासनांचे काय? असा सवाल विरियातोंनी पंतप्रधान मोदींना केला. राज्यातील बेरोजगारी, कोळसा हब या मुद्यांवर मोदींनी भाष्य करावे, असेही विरियातो म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या भाषणाची दखल घेतली असे मला समजले. त्यांनी देखील मुख्यमंत्री सावंत यांच्यासारखेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे विरियातो म्हणाले.

निती आयोगाच्या अहवालानुसार गोव्यात बेरोजगारीचा दर अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे, मोदींनी त्यावर भाष्य करावे. गोव्यात काँग्रेस आमदारांनी केलेले पक्षांतर करुन संविधानाचा हत्या केली. त्यांनी संविधानावर बोलू नये, मोदींनी संविधानाची हत्या केली, असे विरियातो म्हणाले.

त्यांच्या एका केंद्रीय नेत्याने (हेगडे) बहुमत मिळाल्यास याबाबत (पक्षांतराबाबत) कायदा करु असे वक्तव्य केले होते, यावर मोदींनी भाष्य करावे असे विरियातो म्हणाले. मोदींनी गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था, म्हादई, सोने तस्करी या विषयांवर मोदींनी बोलावे असे आवाहन विरियातोंनी केले. गोवा सरकारमधील एक विद्यमान मंत्री सोने तस्करीत सक्रिय असल्याचा आरोप देखील यावेळी विरियातो यांनी केला.

Captain Viriato Fernandes Vs PM Modi
PM Modi On Viriato: 'हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान'; विरियातोंच्या वक्तव्यावर मोदींची प्रतिक्रिया

भाजपला दक्षिण गोव्यात दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवार आयात का करावा लागला? मोदींना उद्योगपतींप्रती खास कळवळा असल्यामुळे त्यांनी असे केले का? असा सवाल विरियातो यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार आहेत, त्यावेळी त्यांच्यासोबत खुली चर्चा करण्यास मी तयार आहे. पंतप्रधान तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवू शकतात मी चर्चेसाठी हजर असेन. मी माझ्या भाषणाचा व्हिडिओ देखील तेथे त्यावेळी दाखवीन, तुमची आर्मी एका बाजूला आणि मी एका बाजूला अशी चर्चा करण्यास तयार असल्याचे विरियातो म्हणाले.

भारतीय नौदलात 26 वर्षे सेवा बजावलेल्या सैनिकाला तुम्ही आव्हान देताय? भाजपमध्ये 18 कोटी कार्यकर्ते असल्याचा दावा तुम्ही करता, तुम्हाला देशाबद्दल खरच प्रेम असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना सेनादलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन का देत नाहीत? सेनादलात सैनिकांची कमतरता असल्याचा दावा विरियातो यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com