Tomato Rate Dainik Gomantak
गोवा

Tomato Rate in Goa : ऐन पावसाळ्‍यात टोमॅटो झाला ‘लालबुंद’

Tomato Rate in Goa : ‘भाव’ वाढला : ६५ रुपये किलो; बटाट्यानेही गाठली पन्नाशी

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Rate in Goa :

पणजी, बेळगाव येथून भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे. सध्या टोमॅटो १२०० रुपये प्रतिकॅरेट अशा पद्धतीने घाऊक व्यापाऱ्यांना मिळत असल्याने पणजी बाजारात टोमॅटो ६० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात आहे.

काही दुकानांमध्ये तर ७० ते ८० रुपये किलोसुद्धा विकला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, कांदा, बटाटा, भाज्यांचे दरही वाढलेले आहेत.

पणजी बाजारात कांदे, बटाटे प्रतिकिलो ५० रुपयांनी विकले जात आहेत. दोन आठवड्याभरापूर्वी राज्यात टॉमेटोचा दर ४० रुपये किलो असा होता. आता आठवड्याच्या सुरूवातील त्यात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.

बेळगावातून टोमॅटोची मोठी आवक होते. सध्या मात्र बेळगावातच टोमॅटोचा दर वाढलेला आहे. त्यामुळे गोव्यातील व्यापारांनाही तो महाग पडत आहे. आठवड्याभरात दरात दुपटीने वाढ झाली आहे.

कांदे-बटाटेही ४० रुपये किलोने विकले जायचे, परंतु आता त्यांच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. जीवनावश्‍यक असलेल्‍या भाजीपालाचा दरही वाढला आहे.

गावठी भाज्‍यांना चांगली मागणी

राज्यातील शेतकऱ्यांद्वारे पिकविण्यात येणाऱ्या गावठी भाज्यांना तसेच रानभाज्यांना चांगली मागणी आहे. बाजारात कीर्ल दाखल झाले असून १०० ते १५० रुपये प्रतिनग दराने विकले जात आहेत. त्यासोबतच, निरफणस, भाजीची केळी, फणस, पिकलेल्या फणसाच्या गरांचे वाटे यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT