Goa vegetable rates Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rates: दसऱ्यानंतर भाज्यांच्या किंमतीत बदल! रताळी, भुईमुगाच्या शेंगा बाजारात दाखल; जाणून घ्या ताजे दर..

Goa Vegetable Prices: विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात उगवणाऱ्या या भाज्यांमुळे ग्राहकांना चव व पोषण यांचा उत्तम संगम मिळतो. भाज्यांचे दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Sameer Panditrao

पणजी: दसऱ्यानंतर व दिवाळीच्या काही दिवस अगोदर बाजारात दाखल होणारी रताळी यंदा लवकरच बाजारात येऊ लागली असून, सध्या ती ६० रुपये प्रतिकिलो दराने पणजी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पौष्टिक रताळ्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून, विक्रेत्यांकडेही त्यांची झपाट्याने विक्री होत आहे.

मात्र, ही रताळी अद्याप सर्व भाजी विक्रेत्यांकडे उपलब्ध नसून काही मोजक्या विक्रेत्यांकडूनच ती मिळत आहेत. यासोबतच नव्या हंगामातील भुईमुगाच्या शेंगादेखील बाजारात दाखल झाल्या आहेत. या शेंगांचे दर १०० रुपये प्रतिकिलो असून, "पहिले पीक" म्हणून अनेकजण आवर्जून या शेंगा खरेदी करत आहेत. बाजारातील विक्रेत्यांच्या मते, आगामी आठवड्यांत रताळी व शेंगांचा पुरवठा वाढेल आणि त्यामुळे दरात किंचित घसरण होण्याची शक्यता आहे.

रताळी व भुईमुगाबरोबरच स्थानिक काटेकणगी, करांदे यांसारखी कंदमुळे तसेच काकडी, चिबूड, दोडकी, भेंडी, वाली, फागला, भाजीच्या केळ्या या पावसाळी भाज्यांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मध्यम आकाराचे चिबूड १०० ते १२० रुपयांना विकले जात असून, कोवळ्या काकडीचा दर ५० रुपये आहे.

या सर्व स्थानिक भाज्या ग्राहकांना ताज्या व चविष्ट मिळत असल्याने अनेकजण त्या आवर्जून खरेदी करत आहेत. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात उगवणाऱ्या या भाज्यांमुळे ग्राहकांना चव व पोषण यांचा उत्तम संगम मिळतो. भाज्यांचे दर मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आगामी सणासुदीच्या काळातही या दरांमध्ये मोठी चढ-उतार होण्याची शक्यता नसल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.

सध्या राज्यात हवामान तसे सामान्य आहे त्यासोबतच लिंबांला मागणीदेखील घटली असल्याने दर आवक्यात आले आहेत. पणजी बाजारात मध्यम आकाराचे ५० रुपयांना २० लिंबू विकले जात आहेत. त्यासोबतच भाज्यांचे दरदेखील मागील आठवड्याच्या तुलनेत समांतर आहेत. फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यावर बाजाराच्या तुलनेत काही प्रमाणात भाज्यांचे दर कमी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मिंगेल आरावजो माझा पाठलाग करत होता', हल्ल्यानंतर 15 व्या दिवशी रामा काणकोणकर बोलले, पोलिसांनी नोंदवला जबाब

Amit Shah Arvind Kejriwal In Goa: गृहमंत्री अमित शहा आणि आपचे अरविंद केजरीवाल शनिवारी गोव्यात

Goa News Live: केरी सत्तरी येसरपंचपदी नंदिता गावस यांची बिनविरोध निवड

"पाकिस्तानचा खात्मा करू, आता संयम दाखवणार नाही" लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा Video

Dhruv Jurel Celebration: भारतीय क्रिकेटचा नवा 'हिरो'! शतक ठोकल्यानंतर ध्रुव जुरेलचं दमदार 'बॅट-टू-रायफल' सेलिब्रेशन, Video Viral

SCROLL FOR NEXT