Bondla Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Sanctuary : बोंडला अभयारण्यात घालवा एक दिवस व एक रात्र; ‘जीटीडीसी’चा खास उपक्रम

बोंडलातील रात्रीचे वास्तव्य तेथील वन खात्याच्या डॉर्मिटरीजमध्ये शेअरींग पध्दतीवर असेल, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि गोवा वन खाते यांच्यातर्फे निसर्गप्रेमींसाठी बोंडला अभयारण्यात एक दिवस व एक रात्र निसर्गाच्या सान्निध्यात घालविणारा खास उपक्रम राबविण्यात येणाार आहे.

त्या 29 व 30 जुलै रोजी निसर्गप्रेमींना ही अनोखी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. बोंडलातील रात्रीचे वास्तव्य तेथील वन खात्याच्या डॉर्मिटरीजमध्ये शेअरींग पध्दतीवर असेल, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

बोंडला अभयारण्य येथे इच्छुक सहभागींना घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था म्हापसा, पणजी व मडगाव येथून करण्यात येणार आहे. त्यानुसार म्हापसा येथील म्हापसा रेसिडेन्सी येथून वाहन 14.30 वा., पर्यटन भवन येथून 15.00 वा. व मडगाव रेसिडेन्सी येथून 15.15 वा. निघणार आहे. (या दरम्यानच्या ठिकाणांवरून सहभागींना वाहनात घेण्याची मुभा आहे).

सविस्तर कार्यक्रमानुसार बोंडला येथे वाहने शनिवार 29 रोजी संध्या. 5 वा. पोचल्यानंतर तेथील डॉर्मिटरीजमध्ये (शेअरींग पध्दतीच्या) चेक ईन करतील. त्यानंतर 6 वा. आईस ब्रेकिंग कार्यक्रम होईल. 6.30 ते 7.30 या वेळेत बोंडला अभयारण्यविषयक उजळणी होईल. रात्री 7.30 वा. बोंडला जंगलात तेथील वन अधिकाऱ्यांसमवेत पायी फिरण्याचा कार्यक्रम होईल.

रात्री 8.30 वा. रात्रीचे भोजन (शाकाहारी व मांसाहारी) होईल. तसेच यावेळी तज्ज्ञांसमवेत वन संवर्धन, साप, बेडूक यांविषयी चर्चा होईल. रविवार 30 रोजी सहभागींना सकाळी 6 वा. उठावे लागेल. त्यानंतर 7 वा. निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी जंगलात पायी नेण्यात येईल.

त्यानंतर 9.30 वा. तेथील रेस्टॉरंटमध्ये नाश्‍ता दिला जाणार आहे. त्यानंतर १०.३० वा. वारसा ठिकाण आणि बोंडला प्राणी संग्रहालयात नेण्यात येईल. १२.३० वा. दुपारचे भोजन झाल्यानंतर या उपक्रमाचा समारोप होईल.

दरम्यान, या सहलीसाठी खर्च रू. 2200/-(चहा, स्नॅक्स, रात्रीचे भोजन,सकाळचा चहा, नाश्‍ता आणि डॉर्मिटरीतील निवास आणि प्रती व्यक्ती 2700/- ट्विन शेअरींग पध्दतीवर आकारण्यात येईल). इच्छुकांनी अनिल दलाल यांच्याशी यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाईन बुकिंग goa-tourism.com यावरून करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT