Panaji Smart City Work Dainik Gomantak
गोवा

Panaji: रस्ते दुरुस्ती, गटारांची दुरवस्था, मोठ्या वाहनांची घुसखोरी; 'स्मार्ट सिटी'त दुचाकीस्वारांचा त्रास कधी संपणार?

Smart City Work: सांतिनेजमध्ये स्मार्ट सिटी मिशिनअंतर्गत नव्याने तयार झालेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराची दुरवस्था झाली आहे.

Sameer Panditrao

पणजी: सांतिनेजमध्ये स्मार्ट सिटी मिशिनअंतर्गत नव्याने तयार झालेल्या रस्त्याच्या बाजूच्या गटाराची दुरवस्था झाली आहे. तर भाटल्यात रस्त्यावर भूमिगत मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी झालेल्या खोदकामामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.

स्मार्ट सिटीची कामे सध्या जोरदार सुरू आहेत. नव्याने भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे आणि मॅनहोलचे काम गतीने सुरू आहेत. आल्तिनो, भाटलेत या कामांनी गती घेतली असली तरी ज्या ठिकाणी मॅनहोल जोडणीचे काम झाले आहेत, त्याठिकाणचे चर अद्यापि दगड-मातीनेच भरलेले आहेत.

अर्धा रस्ता खुला असल्याने दुचाकीस्वार आणि काही चारचाकी चालक बळजबरीने या मार्गावरून ये-जा करताना दिसतात. चार चाकी वाहनांना रस्ता बंद असला तरी आहे त्यातूनच वाहने हाकण्यात अनेकजण धन्यता मानत आहेत, त्यामुळे त्यांचा दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.

चारचाकी ये-जा करताना खोदकाम केलेल्या ठिकाणी अनेकांना ते वाहन मार्गस्थ झाल्याशिवाय ये-जा करता येत नाही. धनलक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीच्या समोर ही कामे सुरू असल्याने या परिसरात सतत धूळ उडत राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT