Panaji Smart City Roadwork  Dainik Gomantak
गोवा

Panaji: स्मार्ट सिटीत नागरिकांच्या जिवाशी खेळ! धोकादायक खड्ड्यामुळे जीव टांगणीला, न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Panaji Smart City Roadwork: खोदकामाच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी वाहनधारकांना काम सुरू असल्याचे सूचना दर्शविणारे दिवे लावण्याची तंबी उच्च न्यायालयाने दिली होती.

Sameer Panditrao

Panaji Smart City Roadwork Safety Measures

पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामाच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी वाहनधारकांना काम सुरू असल्याचे सूचना दर्शविणारे दिवे लावण्याची तंबी उच्च न्यायालयाने दिली होती. परंतु या सूचना किंवा आदेशाचे पालन होताना दिसत नाही. आल्तिनो येथे रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आलेला खड्ड्याच्या बाजूला कोणतीही व्यवस्थितरीत्या बॅरिगेट्स किंवा दिवेही लावले नाहीत.

आल्तिनो येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या वसाहतीमध्ये भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी चेंबर निर्मितीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. आल्तिनोहून भाटलेत जाणारा मार्ग उतरणीचा आहे, त्याच उतरणीच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या अगदी जवळ खोदकाम केले आहे.

रात्रीच्यावेळी वीज गेल्यास किंवा एखाद्या चालकाचा ताबा सुटल्यास चालकाला सुरू असलेले काम दिसले नाही तर ते वाहन पत्रा ढकलून खड्ड्यात पडू शकते. ज्या पद्धतीने सुरक्षा म्हणून पत्रे लावले आहेत, ते अत्यंत धोकादायक आहेत. पत्र्यावर कोणत्याही रंगाच्या चकाकणाऱ्या पट्ट्या चिकटवलेल्या नाहीत.

सर्वत्र नाराजीचा सूर

स्मार्ट सिटीच्या या कामांविषयी सर्वत्र नाराजीचा सूर होता. न्यायालयाने विविध सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे पालन कंत्राटदाराकडून होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT