Panaji: 'स्मार्ट सिटी'च्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा! बेशिस्त पार्किंगमुळे वाढली कोंडी

Panaji Smart City: राजधानीच्या मध्य भागातील स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामे सुरू झाल्याने इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने वाहतूक वळविण्यात आल्याचे जाहीर केले होते.
Panaji Smart City
Panaji Smart City Road ClosureDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Smart City Road Closure

पणजी: राजधानीच्या मध्य भागातील स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कामे सुरू झाल्याने इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने वाहतूक वळविण्यात आल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार आता वाहतूक वळविण्यात आल्याने अनेकांना वळसे मारून ये-जा करावी लागत आहे. त्याशिवाय फिदाल्गो हॉटेल ते चर्च स्क्‍वेअर या १८ जून मार्गावर नेहमीप्रमाणे शहराबाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने संथगतीने वाहतूक होत असल्याचे सोमवारी (ता.१०) दिसून आले.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत तिसऱ्या टप्प्याची कामे सुरू झाली आहेत. त्यासाठी महात्मा गांधी रस्त्यावरील तळावलीकर इलेक्ट्रॉनिक्स समोरील रस्त्याचे स्मार्ट काम सुरू झाले आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता उखडला असून, गटारांचे बांधकाम व पदपथाची निर्मिती केली जात आहे.

Panaji Smart City
Panaji Jetty: पणजी जेटीमधून मासिक 41.16 लाख उत्पन्न, शापोरा प्रकल्प मात्र सुधारणेच्या प्रतिक्षेत

त्याशिवाय भूमिगत वाहिन्याही टाकण्याचे काम हाती घेतले गेले आहे. त्यामुळे या मार्गावरून न वळता भाऊसाहेब बांदोडकर मार्गाकडे जाऊन फिदाल्गो हॉटेलकडे यावे लागत आहे. त्याशिवाय पुढील टप्प्यात आझाद मैदानाजवळ कोळसा दुकानापासून ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या रस्त्यापर्यंतचा भागही खोदला गेला आहे.

याशिवाय कॅफे भोसलेसमोरील वाहतूक बेट हटविण्यात आले असून, काँग्रेस भवनाकडून थेट युनियन बँकेपर्यंतचा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.

Panaji Smart City
Panaji Road Closure: पणजीत वाहतुकीचे वाजणारा बारा; राजधानीतील पाच रस्ते 19 दिवस राहणार बंद

उडपी हॉटेलसमोरील रस्त्याचे ओबडधोबड काम झाले असले तरी तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला दुचाकी व चारचाकींचे पार्किंग असल्याने चारचाकी एकच वाहन मार्गस्थ होते, त्यामुळे वाहतूक कोंडी दिसून येते.हाच प्रकार १८ जून मार्गावरही दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com