Goa Opinion Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: पणजी स्‍मार्ट सिटी; 31 प्रकल्‍पांवर 630.34 कोटी खर्च; नगरविकासमंत्री राणेंनी दिली माहिती

Panaji Smart City Cost: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तराला नगरविकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: पणजी स्‍मार्ट सिटीअंतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेल्‍या ३१ प्रकल्‍पांवर सुमारे ६३०.३४ कोटींचा खर्च करण्‍यात आला आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तराला नगरविकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

पणजी स्‍मार्ट सिटीअंतर्गत निश्‍चित केलेल्‍या प्रकल्‍पांपैकी किती प्रकल्‍प आतापर्यंत पूर्ण झाले आहेत, त्‍या प्रकल्‍पांवर किती खर्च करण्‍यात आला, किती प्रकल्‍पांची कामे सध्‍या सुरू आहेत आणि ती कधीपर्यंत पूर्ण होतील, असे प्रश्‍न युरी आलेमाव यांनी विचारले होते.

या प्रश्‍नांना उत्तरे देताना मंत्री राणे म्हणाले, पणजी स्‍मार्ट सिटी प्रकल्‍पांतर्गत शहरात विविध प्रकारचे ३५ प्रकल्‍प निश्‍चित केले होते. आतापर्यंत त्‍यापैकी ३१ प्रकल्‍प पूर्ण झाले असून, त्‍यावर सुमारे ६३०.३४ कोटी रुपये खर्च केले असून संबंधित प्रकल्‍पांसाठी निर्धारित केलेली रक्कम आणि कंत्राटदारांना दिलेली रक्कम यांचा समावेश असलेली यादी सादर केली आहे.

काम सुरू असलेले प्रकल्‍प

प्रकल्‍प अंतिम मुदत

पाटो - पदपथ, सौंदर्यीकरण ३० सप्‍टेंबर २०२५

पाटो - लँडस्‍कॅपिंगची कामे ३० सप्‍टेंबर २०२५

आल्‍तिनोवरील जलवाहिनी ३१ सप्‍टेंबर २०२५

रायबंदरमधील मार्केट प्रकल्‍प ३० सप्‍टेंबर २०२५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live Updates: विजय 'एनडीए'त आल्यास हरकत नाही - मुख्यमंत्री

Virat Kohli New Look: "दाढी पिकली, 50 वर्षाचा दिसतोस" किंग कोहलीचा नवा लूक व्हायरल, नेटिझन्सनी केलं ट्रोल

Goa Assembly: "बंगळुरूमध्ये चालतं, मग गोव्यात का नाही?" रात्री 1 पर्यंत रेस्टॉरन्ट सुरू ठेवण्याबाबत सरदेसाईंचा सवाल, CM सावंतांकडून सकारात्मक उत्तर

Viral Video: ‘ती’ म्हणेल तेच खरं! पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडसमोर मित्राला ठरवलं चुकीचं, प्रेमात हरलं लॉजिक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Raksha Bandhan: रक्षाबंधनासाठी बाजारपेठा फुलल्‍या!

SCROLL FOR NEXT