smart city electric bus Dainik Gomantak
गोवा

Electric Bus : पणजी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत धावणार 60 इलेक्ट्रिक बसेस

Electric Bus : त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्याचे नियोजन करता येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Electric Bus : पणजी, पणजीत स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध भागात इलेक्ट्रिक व इतर बसेस धावणार आहेत. त्याबाबतची अधिसूचना नुकतीच वाहतूक खात्याने जारी केली आहे.

कदंब ट्रान्स्पोर्ट कार्पोरेशन लिमिटेड (केटीसीएल) ने पणजीतील सध्याच्या खासगी बसेसच्या जागी ६० स्मार्ट बसेसचा समावेश केला आहे.

यामध्ये मिनी इलेक्ट्रिक बसेस, मिनी डिझेलवर चालणाऱ्या बसेस, मायक्रो मेडिकल बसेस आणि इलेक्ट्रिकल बग्गीचा समावेश असणार आहे. या बसेस सध्या कार्यरत असलेल्या ५७ खासगी बसेसचा ताबा घेणार आहे.

पणजी आणि आसपासच्या प्रवाशांच्या प्रवासात सुव्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न आहे. या अधिसूचनेमध्ये मिरामार, दोना पावला, करंझाळे, बांबोळी, गोवा विद्यापीठ, कुजिरा, ताळगाव, सांताक्रूझ आणि आल्तिनो या प्रमुख ठिकाणी बसेस धावतील, असे नमूद केले आहे.

क्यूआर कोड तिकीट, अत्याधुनिक सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि रिअल-टाइम बस ट्रॅकिंग यासारख्या सोयीस्कर सुविधांचा प्रवाशांना फायदा या बससेवेमुळे प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्याचे नियोजन करता येणार आहे.

शिवाय, परवडणाऱ्या प्रवासाची खात्री करून भाडेदर दहा आणि २० रुपये निश्‍चित करण्यात आले आहे. या अभिनव वाहतूक नेटवर्कचा एक भाग म्हणून मोटार नसलेल्या रस्त्यांना पुरविणाऱ्या इलेक्ट्रिक बग्गीजची कल्पनेचाही या सेवेत समावेश आहे. या वाहतूक व्यवस्थेविषयी भागधारकांना ३० दिवसांच्या कालावधीत आक्षेप नोंदविण्यास सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT