पणजी : भक्ती हीच आमच्या जीवनाची खरी कमाई आहे. त्या ईश्वरभक्तीच्या माध्यमातून आम्हाला आमचे जीवन सार्थकी लावणे शक्य आहे. भक्तीला अन्य दुसरा पर्याय नाही, असे उद्गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
व्हळांत, बेती येथील श्री पाजीकर वडेश्वर देवस्थानच्या सौजन्याने श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापनेच्या चौदाव्या वर्धापनदिन सोहळ्यात श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पिळर्णचे पंच रूपेश नाईक, रेईश-मागूशचे पंचसदस्य प्रसन्ना नागवेकर, श्री पाजीकर वडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गिरीश पालेकर, सचिव दीपक म्हापसेकर, देवस्थान समितीचे पदाधिकारी मोहन च्यारी, अशोक सोपटे, गजानन राऊळ, सूरज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मंदिराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या शेडचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पंचायत निधीअंतर्गत ही शेड उभारण्यात आली असून या शेडमुळे यंदा मंदिर व्यवस्थापनाला भक्तांची उत्तम सोय करता आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोन्ही दिवसांचे यजमानपद भूषविलेले सूरज नाईक यांनी केले.
कोणी, कधी काय करायचे, हे तो भगवंत ठरवत असतो. कुठलेही कार्य करताना भावना प्रामाणिक असल्या आणि त्याला लोकशक्तीची आणि इच्छाशक्तीची जोड असेल तर ते कार्य ईश्वरापर्यंत पोहोचते. श्री साईबाबांची अकरा वचने श्रद्धा व भक्तीने कंठस्थ करा. श्री साईबाबा निश्चितपणे तुमच्यासाठी धावून येतील.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.