Goa Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Panaji Shigmotsav: पणजीत पहाटेपर्यंत ओस्सय ओस्सयचा गजर! 35 चित्ररथ, 18 रोमटामेळ, पारंपरिक नृत्यगटांचा सहभाग

Goa Shigmotsav 2025: गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला पणजी शिगमोत्सव यंदा पर्यटकांसाठी अभूतपूर्व अनुभव ठरला.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला पणजी शिगमोत्सव यंदा पर्यटकांसाठी अभूतपूर्व अनुभव ठरला. रंगीबेरंगी रोषणाई, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात काढलेले रोमटामेळ, कल्पकतेची उंची गाठणारे चित्ररथ आणि उत्साही कलाकारांच्या वेशभूषेने सारा आसमंत भारावला होता. हा उत्साह एवढा उंचावला की, शिगमोत्सव पहाटे सहा वाजेपर्यंत रंगला.

शहरातील प्रमुख मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. जुने सचिवालय ते कांपाल मार्गावर काढलेल्या मिरवणुकीसाठी स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. चित्ररथ, लोकनृत्य, रोमटामेळ पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड उत्साह दिसत होता. मध्यरात्रीनंतरही लोकांची अफाट गर्दी पाहून वातावरण जणू दुपारसारखं भासत होतं.

शहरात एवढी गर्दी उसळली की, मध्यरात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पर्यटकांनी मात्र याचा फारसा त्रास न मानता, रस्त्यावरच नाचत, फोटो काढत शिमगोत्सवाचा आनंद लुटला.

कलाकारांनी जिंकली उपस्थितांची मने

यंदा मिरवणुकीत सुमारे ३५ चित्ररथ, १८ रोमटामेळ, आणि पारंपरिक नृत्यगटांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक चित्ररथ भारतीय संस्कृती, पुराणकथा आणि समाज प्रबोधनाच्या वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत होता. नृत्यगटांनी ढोल-ताशांच्या गजरात उड्या मारत, नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. गोव्याच्या ग्रामीण भागातून आलेले कलाकार आपला सांस्कृतिक वारसा सादर करत होते. रोमटामेळात सहभागी झालेले कलाकार, पारंपरिक पोशाखात ताशाच्या ठेक्यावर बेधुंद नाचत होते. काही पर्यटकांनीही यात सहभाग घेतला. वातावरणात वाऱ्यासोबत ढोलाचा नाद घुमत होता आणि प्रत्येकजण त्या लयीत झुलत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT