Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्वरी खंडणी प्रकरण! सात संंशयितांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश; खटल्याची सुनावणी होणार सुरू

Porvorim Truck Robbery Case: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून पर्वरी येथे रात्रीच्यावेळी दोन ट्रक अडवून चालक व क्लिनर्सकडून सुमारे ५ लाखांची खंडणीवसुली व दरोडाप्रकरणी सातजणांविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा आदेश पणजी सत्र न्यायालयाने दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Truck Robbery Case By Fake Anti-Corruption Department Officer

पणजी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून पर्वरी येथे रात्रीच्यावेळी दोन ट्रक अडवून चालक व क्लिनर्सकडून सुमारे ५ लाखांची खंडणीवसुली व दरोडाप्रकरणी संशयित विनायक ऊर्फ लुलू नाईक, साई दळवी, फिरोझ शेख, प्रसाद नाईक, हुसेनसाब ऊर्फ नझीर तशिलदार, श्रीकांत मोहन देवरपल्ली व वहिदाबानू हवेरी या सातजणांविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा आदेश पणजी सत्र न्यायालयाने दिला.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात संशयितांविरुद्ध भादंसं कलम १७०, ३४१, ३८४, ३८५, ३९५, ३६५ व १२० बी खाली सादर केलेले पुरावे पुरेसे आहेत. संशयित पाचपेक्षा अधिक असल्याने हा दरोड्याचा गुन्हा ठरतो. त्यांनी कटकारस्थान रचून ट्रक चालकांना लुटण्याचा गुन्हा केला आहे, असे निरीक्षण नोंदवत या खटल्यावरील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

मद्यसाठा असलेले दोन ट्रक मडगाव येथून १० मे २०१९ रोजी संध्याकाळच्यावेळी निघाले होते. संशयितांनी एका चारचाकी व एका दुचाकीवरून या ट्रकचा पाठलाग केला. जेव्हा हे ट्रक पर्वरी येथील आयकॉन शोरूमच्या ठिकाणी पोहचले असता या वाहनातील ७ संशयितांनी ते ट्रक अडवले.

ट्रक चालक व क्लिनर्सकडे मद्यसाठ्यासंदर्भात कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाखांची खंडणी मागण्यात आली. हे पैसे घेतल्यानंतर संशयितांनी दोन्ही ट्रकच्या चालक व क्लिनर्सचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी नेऊन सोडले. तेथेही त्यांच्याकडे असलेले ४५ हजार रुपये संशयितांनी घेतले.

आणखी ३ लाखांची मागणी केली, मात्र त्यांच्याकडे नसल्याने त्यांना तेथेच टाकून पळून गेले. याप्रकरणाची माहिती ट्रक मालकाला चालक व क्लिनर्सनी दिली असता पर्वरी पोलिसांत फ्रासिस डिसोझा याने तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत सातही संशयितांना गजाआड केले व त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT