Sessions Court |Goa News  Gomantak Digital Team
गोवा

Panaji Session Court : गोमंतक भंडारी समाज पदाधिकाऱ्यांविरुद्ध जमीन हस्तांतर घोळप्रकरणी गुन्हा दाखल

बोगस नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे हे पदाधिकारी समाजबांधवांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे जमा करत असल्याचे तक्रार.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा येथील श्री बोडगेश्‍वर मंदिराजवळ गोमंतक क्षत्रिय भंडारी समाजाच्या जमीन मालमत्ता हस्तांतर घोळप्रकरणी पणजी पोलिसांना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गोमंतक भंडारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. चौकशीसाठी संशयितांना समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ॲड. अनिश बकाळ व ॲड. अतिश मांद्रेकर या दोघांनी ४ डिसेंबर २०२० व २४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वेगवेगळ्या तक्रारी गोमंतक भंडारी समाजाचे पदाधिकारी अशोक कृष्णा नाईक, देवानंद नाईक, कृष्णा शाणू गोवेकर, झोगुसो नाईक व इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध पणजी पोलिसांत दाखल केल्या होत्या. ९ जून २०२० रोजी या पदाधिकाऱ्यांनी म्हापसा येथील समाजाची जमीन मालमत्ता पणजीतील उत्तर गोवा निबंधक कार्यालयात हस्तांतर करताना वैध मालकी दाखला किंवा हस्तांतर दाखला घेतला नव्हता.

या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या मूळ नोंदणी प्रमाणपत्राशिवाय विविध बँकांमध्ये खाती उघडली होती. या बँकामधून पैशांचा व्यवहार करताना भंडारी समाजाकडून जमा केलेल्या रकमेपैकी सुमारे १० लाख रुपये काढले होते व त्या रक्कमेचा उल्लेख न करता बोगस ऑडिट अहवाल सादर केले होते.

बोगस नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे हे पदाधिकारी समाजबांधवांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे जमा करत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. त्यांनी त्याची प्रत उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना दिली होती. या प्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

२४ तासांत तक्रार दाखल करा

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी तक्रार फेटाळली होती. त्याविरोधात तक्रारदारांनी सत्र न्यायालात आव्हान दिले होते. या आव्हान अर्जावरील सुनावणीनंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून २४ तासांत तक्रार दाखल करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायालयाने पणजी पोलिसांना दिला होता. या प्रकरणातील चौकशीचा तपास अहवाल दर पंधरवड्याने न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT