Panaji
Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : रॉयलाचा काँग्रेसला रामराम; बाणावलीत चुरस वाढली

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

सासष्टी, काँग्रेसच्या रॉयला फर्नांडिस यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.

आपण कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊनच हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे माजी सरचिटणीस रॉयला फर्नांडिस यांनी सांगितले. इंडिया आघाडीतर्फे आम आदमी पक्षाचे उमेदवार जोसे पिमेंता यांनी मंगळवार ११ जून रोजी अर्ज दाखल केला.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात रॉयला फर्नांडिस, फ्रॅंक फर्नांडिस व ग्रेफन फर्नांडिस यांचा समावेश आहे. त्यांनी आपले अर्ज निर्वाचन अधिकारी गुरुदास देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे बाणावलीत चुरस वाढली आहे.

जिल्हा पंचायत व पंचायत स्तरावरील निवडणूक पक्षीय स्तरावर होऊ नये. इंडिया आघाडी केवळ लोकसभा व विधानसभा निवडणुकांपुरती आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना इच्छा असेल तर निवडणूक लढविण्याची मुभा असायला हवी. इंडिया आघाडी हो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात स्थापन झाली आहे. बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत भाजप काही आपला उमेदवार ठेवणार नाही, मग इंडिया आघाडीचा उमेदवार कोणाच्या विरोधात असा प्रश्र्नही रॉयला फर्नांडिस यांनी केला.

बाणावलीचे सरपंच शावियेर फर्नांडिस यांचा तसेच मच्छीमार समाजाचे नेते पेले फर्नांडिस व इतरांचा पाठिंबा लाभलेल्या ग्रेफन फर्नांडिस यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. लोकांनी पाठिंबा दिला म्हणूनच जिल्हा पंचायत पोटनिवडणूक लढवीत असल्याचे ग्रेफन यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ केवळ दीड वर्षांचा बाकी असताना निवडणुकीला महत्त्व काय? असे विचारता ते म्हणाले, आपल्याबरोबर माजी जिल्हा पंचायत सदस्य सुद्धा आहेत. त्यांचा सल्ला घेऊन मतदारसंघातील लोकांची कामे करणार आहे. जी काही कामे बाकी आहेत, ती पूर्ण केली जाईल.

सरदेसाईंशी बोलणार!

ग्रेफन फर्नांडिसला पाठिंबा दिलेले गोवा फॉरवर्डचे मच्छीमारांचे नेते पेले फर्नांडिस यांनी सांगितले, की गोवा फॉरवर्डचा जरी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असला तरी तसे आम्हांला सांगण्यात आलेले नाही. आपण या संदर्भात फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी बोलणार आहे. ग्रेफन बरोबर बाणावलीतील युवा वर्ग आहे. इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर करताना आम्हांला कोणीही विश्र्वासात घेतले.

आज अर्ज छाननी

१३ रोजी अर्जांची छाननी होईल. शुक्रवार १४ जून रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. जर चारही उमेदवार कायम राहिले, तर ही निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २३ जून रोजी निवडणूक व सोमवार २४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

SCROLL FOR NEXT