Nirmala Sawant  Gomantak Digital Team
गोवा

Panaji : लोहिया मैदानावर जाहीर सभा; म्हादईप्रश्नी सरकार गंभीर नाही - निर्मला सावंत

वन खात्याच्या वाइल्ड लाईफ वॉर्डनकडून कर्नाटककडून आलेल्या पत्रावर जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत यावर सर्वोच्च न्यायालयही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : कर्नाटककडून म्हादईच्या कळसा, भांडुरा या उपनद्यांचे पाणी वळवण्याचे प्रयत्न सुरूच असून याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, असा आरोप म्हादई बचाव आंदोलनाच्या नेत्या निर्मला सावंत यांनी केला आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात रविवार, १८ जून रोजी मडगावच्या लोहिया मैदानावर जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यासंबंधी पणजीत शुक्रवारी (ता.१६) विशेष बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

वन खात्याच्या वाइल्ड लाईफ वॉर्डनकडून कर्नाटककडून आलेल्या पत्रावर जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत यावर सर्वोच्च न्यायालयही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही. यासाठी वन खात्याच्या वाईल्ड लाईफ वॉर्डनने आक्रमकपणे कर्नाटक सरकारच्या सध्याच्या भूमिकेवर आणि सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्यावर (डीपीआर) कडक आक्षेप नोंदवणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्यांच्याकडून याबाबत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न असाच राहणार आहे, अशी माहिती म्हादई बचाव आंदोलनाचे वकील भवानीशंकर गडणीस यांनी दिली आहे.

सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्‍नावर सरकारकडून जे प्रयत्न करणे अपेक्षित आहे ते होत नाहीत. कर्नाटककडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरूच आहेत. अशातच केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या डीपीआरला मंजुरी दिली आहे. शिवाय कर्नाटकने या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. याशिवाय याअगोदरच कर्नाटकने जे पाणी वळवले आहे. त्याबाबतही सरकार आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे मांडत नाही. - निर्मला सावंत, म्हादई बचाव आंदोलनाच्या नेत्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT