Private Vehicles Dainik Gomantak
गोवा

Private Vehicles : खासगी वाहने सर्रास भाडेपट्टीवर! पोलिसांची डोळेझाक

Private Vehicles : सकाळच्यावेळी आंतरराज्य प्रवासी बसमधून येणाऱ्या पर्यटकांना भाडेपट्टीवर खासगी कार किंवा दुचाकी देणारे दलाल बसस्थानकावर फिरकत असतात. दुचाकी किंवा कार पार्किंगमध्ये ठेवून ते पर्यटक ग्राहकांशी भाड्याचा सौदा करतात व त्यानंतर त्यांना ही वाहने उपलब्ध करतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Private Vehicles :

पणजी, राज्यात रेंट ए कॅब व बाईक पर्यटकांना भाडेपट्टीवर देण्यास कायदेशीर परवाना वाहतूक खात्याने दिलेला आहे. तरी काही दलाल बसस्थानकांवर व किनारी भागात सकाळच्यावेळी खासगी वाहने भाडेपट्टीवर देतात.

हे प्रकार सर्रास सुरू आहेत. हे प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत घडत असताना त्याकडे पोलिस व वाहतूक खात्याकडून डोळेझाक केली जात आहे. ही खासगी वाहने भाडेपट्टीवर पर्यटकांना देऊन पोलिसांनी जर अडविल्यास ती मित्राची किंवा नातेवाईकाचे वाहन असल्याचे सांगण्यास सांगितले जाते. मात्र, हे पर्यटक पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांकडून चौकशीवेळी गडबडत आहेत.

सकाळच्यावेळी आंतरराज्य प्रवासी बसमधून येणाऱ्या पर्यटकांना भाडेपट्टीवर खासगी कार किंवा दुचाकी देणारे दलाल बसस्थानकावर फिरकत असतात. दुचाकी किंवा कार पार्किंगमध्ये ठेवून ते पर्यटक ग्राहकांशी भाड्याचा सौदा करतात व त्यानंतर त्यांना ही वाहने उपलब्ध करतात.

या ठिकाणी ज्यांच्याकडे ‘रेंट ए कॅब’ व ‘बाईक’ परवाना आहे, त्यांच्याकडून तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नाही. हा दलालांचा गुंडप्रवृत्तीचा गट असल्याने ते परवानाधारकांनाच दम भरतात. यावरून अनेकदा दोन गटांमध्ये खटके उडून मारहाणीचेही प्रकार घडले आहेत.

पणजी तसेच किनारी भागात ‘रेंट ए कॅब’ व ‘बाईक’ भाडेपट्टीवर घेऊन फिरण्यासाठी पर्यटक पसंत करतात. मात्र, परवाना असलेल्या वाहनांची नंबर प्लेट काळ्या रंगाची असते हे त्यांना माहीत नसते. हे दलाल परवाने नसलेली खासगी वाहने भाडेपट्टीवर देतात व त्यांच्याकडून भरमसाट भाडेही वसूल करतात.

पणजीत बसस्थानकावर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस असतात. त्यांच्यासमोरच हे दलाल पर्यटकांना खासगी वाहन भाडेपट्टीवर देण्याचा व पैसे ठरवण्याचा सौदा सुरू असतो. मात्र त्यांना कोणीही विचारत नाहीत. ही खासगी वाहने पार्किंगमध्ये उभी करून ठेवलेली असतात. जेव्हा भाडे ठरते तेव्हा पर्यटकांना त्या वाहनापर्यंत नेऊन ती दिली जाते. त्यांची ही मोडस ऑपरेंडी पोलिसांना माहीत आहे तरीही डोळेझाक करण्याचे प्रकार सुरू आहेत.

पोलिसांशी साटेलोटे; वाहने रस्त्यावरच !

डिसेंबर तसेच मे महिन्यात पर्यटकांची गोव्यात मोठी गर्दी असते अशावेळी असलेली ‘रेंट ए कॅब’ व ‘बाईक’ वाहने कमी पडतात अशावेळी खासगी वाहनेही भाडेपट्टीवर देण्याचे प्रकार होतात. काहींजणांकडे परवाने असलेली पाच दुचाकी वाहने असतात व त्याच नावाखाली आणखी काही खासगी वाहने भाडेपट्टीवर दिली जातात.

सध्या वाहतूक खात्याने रेंट ए कॅब व बाईकला परवाने देण्याचे बंद केले आहे. रेंट ए बाईक व कॅब भाडेपट्टीवर देणाऱ्या मालकाकडे त्याचे स्वतःचे कार्यालय असणे सक्तीचे आहे. ही वाहने रस्त्यावर नव्हे तर त्याने त्यासाठी पार्किंगची जागाही ठेवायला हवी. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून ही वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवली जातात. पोलिसांशी साटेलोटे असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही ‘रेंट ए बाईक’ व कॅबचा परवाने असलेले वाहन मालक करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT