Panaji Potholes Issue Dainik Gomantak
गोवा

Panaji Potholes Issue: मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण! वाहनचलकांचा सरकारच्या कामावर संताप

पणजीतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

Kavya Powar

Panaji Potholes Issue: काही दिवस उसंत घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार कोसळू लागला आहे. पावसाने पणजीसह संपूर्ण राज्याला झोडपून काढले. त्यामुळे पणजीतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी खोदकाम केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी तात्पुरते डागडुजी केलेले रस्ते पुन्हा एकदा खराब झाले असून यामुळे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी बनले आहेत.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.

सांतीनेज परिसरात, ताज विवांता जंक्शन ते काकुलो मॉलपर्यंतच्या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण जास्त असते. पावसामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तिथूनच ताळगावला जाणारा रस्ताही खड्ड्यांनी भरला आहे.

गटारांची कामे पूर्ण करण्यासाठी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. तेव्हापासून रस्त्यावर वाहन चालवताना चालकांना त्रास होत आहे.

तसेच, गीता बेकरी, पणजी पोलीस स्टेशनसह मार्केट परिसरातील नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

पणजीतील अंतर्गत भागातही हीच समस्या असल्याचे वाहनचालक सांगतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून जेव्हा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी रस्ते खोदण्यात आले तेव्हापासून पणजीत प्रवाशांना त्रासदायक अनुभव आले आहेत.

यावर्षी जून महिन्यात ही कामे अचानक अर्धवट सोडून रस्त्यांचे डांबरीकरण घाईघाईने करण्यात आले. मात्र पावसाळ्यात तरीही रस्ते पाण्याखाली गेलेच.

पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांची तीच गत झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक करावा लागत आहे. सरकारने हे काम नीट पूर्ण केले नसल्याचे म्हणत चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: तिस्क-उसगाव येथे कार व बुलेट यांच्यात अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT