Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Panaji Crime: पणजी पोलिस स्थानकासमोर राडा! 2 गटांत तुंबळ हाणामारी; 7 जणांना अटक

Panaji Gangwar: पणजी पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच रविवारी सकाळी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकाच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी पोलिस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच रविवारी सकाळी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकाच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर देखील दोन्ही गटांत वाद सुरूच राहिला असून या भांडणादरम्यान पोलिसांची कुंडी देखील फुटली. तसेच घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी सुमारे ६.१५ वाजता ही घटना घडली. यासंदर्भात पणजी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ अंतर्गत दंगल, बेकायदेशीर जमाव, हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही तक्रार पोलिस हेड कॉन्स्टेबल सतीश माजे यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन स्वतंत्र गट स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वाद घालत होते.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील सातजणांविरुद्ध दंगल, हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पणजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश नाईक हे तपास अधिकारी असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

वादाचे रुपांतर मारामारीत

या वादातील बेती येथील गटात देऊ कवस (५२), त्यांची पत्नी ज्योती कवस (४८), मुलगी रोश्नी कवस (३०) आणि मुलगा सोहिल कवस आणि दुसऱ्या गटात इम्रान कबुर्गी (२३, चिंबल), याकुब वल्लिकार (३८, चिंब) आणि मुबारक भंडारी (३५, बांबोळी) यांचा समावेश होता. या दोन्ही गटांत प्रथम वाद सुरू झाला आणि त्याचे रुपांतर शाब्दिक चकमकीनंतर थेट हाणामारीत झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही गटांनी परस्परांवर शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

लोखंड आणि ‘पेपर स्प्रे’चा वापर

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दोन्ही गटातील वाद हा अधिक वाढल्यावर देऊ कवस यांनी लोखंडी हत्याराने याकुब वल्लिकारवर हल्ला केला. दरम्यान, दुसऱ्या गटातील एका व्यक्तीने ‘पेपर स्प्रे’चा वापर करून हल्ला केला. यामध्ये याकूब याचा डावा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला. घटनास्थळी उपस्थित पोलिस कर्मचारी तात्काळ मध्यस्थीला आले. मात्र, दोन्ही गट थांबण्यास तयार नव्हते. परिणामी पोलिस स्थानक परिसरात तणाव निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT