Panaji police station attack case  Dainik Gomantak
गोवा

Panaji police station attack : सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी द्या!

मोन्सेरात यांचा अर्ज; पणजी पोलिस स्थानकावर हल्लाप्रकरणी सुनावणी सुरू आहे

दैनिक गोमन्तक

Panaji police station attack : पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीस कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज शुक्रवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि त्यांची पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर केली.

या प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारी होणार असून त्यावेळी या मागणीवर न्यायालय निकाल देणार आहे. आजच्या सुनावणीस जेनिफर मोन्सेरात हजर होत्या; पण बाबूश गैरहजर होते.

सुदेश नाईक यांनी आजच्या सुनावणीवेळी उदय मडकईकर, दयानंद कारापूरकर, कॅरोलिना पो यांच्यासह एकूण आठ संशयितांची ओळख पटवली.

गुदिन्होप्रकरणी ब्रागांझांची साक्ष

काही कारखान्यांना बेकायदा वीज बिलात सवलत देऊन ४.५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले तत्कालीन वीजमंत्री तथा विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी न्या. आगा यांच्यासमोर सुरू असून या प्रकरणातील साक्षीदार अरुण ब्रागांझा यांची उलटतपासणी पूर्ण झाल्याने त्यांची साक्ष पूर्ण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT