Panaji police station attack case  Dainik Gomantak
गोवा

Panaji police station attack : पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणातील आणखी संशयिताची ओळख पटली

हल्ल्यावेळी वापरलेल्या कारची तत्कालिन पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी ओळख पटवली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत नवीन अपडेट समोर आली आहे. हल्लाप्रकरणी तत्कालिन पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी आणखी काही संशयितांची व हल्ल्यावेळी वापरलेल्या कारची ओळख पटवली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. दक्षिण गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी पार पडली.

फेब्रुवारी 2008 मध्‍ये ताळगावचे तत्‍कालीन आमदार बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केल्‍यानंतर विरोधी गटातील संशयितांनाही अटक करा, अशी मागणी घेऊन हा जमाव पोलिस स्‍थानकावर आला होता.

पोलिसांच्‍या आरोपपत्राप्रमाणे त्‍यावेळी मोन्‍सेरात यांनी प्रक्षोभक भाषण केल्‍याने जमाव खवळला आणि त्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत कित्‍येक पोलिस जखमी झाले.

या प्रकरणात तपास करण्‍यास सीबीआयने बाबूश मोन्‍सेरात व त्‍यांच्‍या पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांच्‍यासह एकूण 37 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान, या हल्‍ला प्रकरणातील तपास अधिकारी सुदेश नाईक यांनी आणखी एक संशयित असलेला हनिफउल्‍ला खान या संशयिताची ओळख पटवली तसेच या तोडफोडीच्‍यावेळी फोडण्‍यात आलेल्‍या एका आल्‍टो गाडीचीही नाईक यांनी ओळख पटवली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT