Goa Monsoon 2023 : डोंगरावरून एकाएकी चिखल, रेतीमिश्रीत पाणी नागरीवस्‍तीत

सुळकर्णेतील प्रकार : नागरिक संभ्रमात, प्रशासनाकडून पाहणी
sanguem sulkarna
sanguem sulkarna Dainik Gomantak
Published on
Updated on

सांगे तालुक्यातील सुळकर्णे गावात डोंगराळ भागातून एकाएकी मोठ्या प्रमाणात पाण्‍यासह चिखल, माती वाहून येऊ लागल्‍याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. पारंपरिक संकेतांनुसार ही ढगफुटीची शक्‍यता मानली जात आहे.

27 जुलैपासून सुळकर्णे गावाला लागून असलेल्या डोंगराच्या खालच्या बाजूने चिखलमिश्रित पाणी नागरी वस्‍तीकडे येऊ लागले. या संदर्भात माहिती मिळताच केपे मामलेदार, पोलीस निरीक्षक, अग्निशामक दलाच्‍या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

sanguem sulkarna
Mapusa Market: म्हापसा व्यापारी संघटनेकडून नगराध्यक्षांना निवेदन; मार्केटमधील समस्यांवर वेधले लक्ष

खनिज खंदकात भरलेले पाणी येत आहे का, याचीही पडताळणी करण्‍यात आली. पण तेथून पाणी येत नाही असे सिद्ध झाले. त्‍यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका जागेतून पाणी येत असल्याचे दिसून आले.

स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी रात्री अग्निशामक दलाचे जांबावलीकर तसेच केपे पोलिसांना बरोबर घेऊन सुलकर्णा गावाला भेट देऊन पाहणी केली. मोठ्या प्रमाणात पाणी गावात येत असल्याने त्यांनी याठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात यावे अशी सूचना दिली.

sanguem sulkarna
Goa Cancer Centre: गोव्याची आरोग्य क्षेत्रात वाटचाल! लवकरच सुरू होणार कॅन्सर सेंटर; पंतप्रधानांनी केले कौतुक

फळदेसाई संतापले

राज्यात आपत्ती व्यवस्थापन अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न मंत्री फळदेसाई यांनी उपस्थित केला. सुळकर्णे गावावर एवढे मोठे संकट ओढवले असताना आपत्ती व्यवस्थापनाने लोकांच्या सुरक्षेविषयी कोणतीच उपाययोजना हाती घेतली नसल्याचा दावा करत फळदेसाई यांनी संताप व्यक्त केला.

पाण्‍याचा दबाव वाढल्‍याचा परिणाम

आज, 28 रोजी सकाळी केपेचे मामलेदार प्रताप गावकर तसेच खाण खात्याचे अधिकारी व भूगर्भतज्‍ज्ञ यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली असता या दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याचा दबाव वाढल्याने माती, चिखलमिश्रित पाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कालपासून येत असलेल्या या पाण्यामुळे सुळकर्णे गावातील लोकामधील भीती अजूनही कमी झालेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com