court Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate : पणजी पोलिस स्टेशन हल्ला प्रकरण; पोलीस निरीक्षकांची न्यायालयात साक्ष, पुढील सुनावणी 'या' तारखेला

तत्कालीन तपास अधिकारी तुषार लोटलीकर यांची मडगाव विशेष न्यायालयासमोर साक्ष झालीय.

गोमन्तक डिजिटल टीम

19 फेब्रुवारी 2008 रोजी पणजी पोलिस स्थानकावरील मोर्चा प्रकरणासंबंधी एक update हाती येतेय. तत्कालीन तपास अधिकारी तुषार लोटलीकर यांची मडगाव विशेष न्यायालयासमोर साक्ष झालीय. यावेळी बाबूश मोन्सेरात आणि इतर संबंधित न्यायालयीन कामकाजावेळी हजर होते. या घटनेची पुढील सुनावणी 3 मार्च ला असून त्यावेळी पीआय सुदेश नाईक त्यांचे म्हणणे कोर्टासमोर मांडतील अशी माहिती प्राप्त झाली आहे.

2008 साली पणजी पोलिस स्थानकासमोरील जमाव हिंसक बनून हल्लाबोल करू लागल्यानंतर काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना पांगवण्यासाठी स्थानकाबाहेर हवेत गोळीबार केला. पोलिस व जमाव यांच्यात झालेल्या धुमश्‍चक्रीवेळी एका पोलिसाकडून काडतूस हरविल्याची तक्रार दाखल झाली होती.

जमाव हिंसक बनण्यापूर्वी मोन्सेरात दाम्पत्य तेथे उपस्थित होते. त्यानंतर ते मुलाच्या चौकशीसाठी पोलिस स्थानकात आले असता त्यांना अटक करण्यात आली, अशी जबानी तक्रारदार तथा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी यापूर्वी न्यायालयात दिली होती. दरम्यान हे प्रकरण न्याय्यप्रविष्ट असून पुढील सुनावणी 3 मार्चला होणार असल्याची माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT