Raid on Porvorim Fake Call Centre:  Dainik Gomantak
गोवा

Raid on Porvorim Fake Call Centre: पर्वरीतील अवैध कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त, 18 जणांना अटक

पणजी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Akshay Nirmale

Panaji Police Raid on Porvorim Fake Call Centre: पर्वरीतील एका अवैध कॉल सेंटरवर छापा टाकून पणजी पोलिसांनी येथे काम करणाऱ्यांना अटक केली आहे. येथून जवळपास 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखाली पणजी पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा छापा टाकला. ओरलँडो गार्डन, अल्टो तोर्डा, पर्वरी येथे हा छापा टाकण्यात आला.

याठिकाणी अवैध कॉल सेंटर चालवले जात असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. छाप्यादरम्यान या कॉल सेंटरवर एकूण 18 जणांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 13 लॅपटॉप, 13 मोबाईल फोन, 04 मोडेम आणि 04 राउटरसह सुमारे 15 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर करत आहेत.

हे सर्व संशयित आरोपी अमेरिकेतील नागरिकांचे वैयक्तिक तपशील मिळवत होते. ज्यांनी आपल्या देशात विविध प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केला होता. ई-लोन कंपनीचे कर्मचारी किंवा मर्चंट कॅश कंपनीचे अशी तोतयागिरी करून आरोपींनी त्यांच्या मोबाइल फोनवर आणि लॅपटॉपवर इन्स्टॉल केलेल्या गुगल व्हॉईस अॅप्लिकेशनद्वारे त्यांना कॉल करत होते.

ई लोन कंपनी किंवा मर्चंट कॅश कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत हे संशयित आऱोपी कॉल करायचे.ज्यांनी आपल्या देशात विविध प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, अशाच लोकांचा वैयक्तिक तपशील हे संशयित आरोपी मिळवत होते. फोन किंवा लॅपटॉपवर डाऊनलोड केलेल्या गुगल व्हॉईस अॅप्लिकेशनद्वारे हे कॉल केले जायचे.

कर्ज वाटपाच्या बहाण्यानेही फसवणूक केली जायची. या कर्जाच्या रकमेवर 10 टक्के प्रक्रिया शुल्क घेतले जात होते. त्यांनी कर्जदार ग्राहकांना गुगल प्ले गिफ्ट कार्ड, अॅपल पे गिफ्ट कार्ड, वॉलमार्ट गिफ्ट कार्ड, टार्गेट गिफ्ट कार्ड यांसारख्या ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रक्रिया शुल्क/ सुरक्षा ठेव भरण्याचे निर्देश दिले जात होते.

याद्वार दिलेली रक्कम यूएसएमधील एजंटने सागर मेहतानी याला भारतात हवाला व्यवहाराद्वारे हस्तांतरित केली गेली आहे. सागर मेहतानी आणि त्याची पत्नी बन्सरी तनवाणी हे मुख्य आरोपी असून ते हे बनावट कॉल सेंटर चालवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT