Goa police Twitter
गोवा

32 लाखांच्‍या दागिन्‍यांवर डल्ला! गोवा पोलिसांची मध्‍य प्रदेशात फिल्मी स्टाईल कारवाई

इंदोर येथील न्यायालयात ट्रान्झिट वॉरंट मिळवून शोरूम कर्मचाऱ्याला मध्‍य प्रदेशातून गोव्यात आणले.

दैनिक गोमन्तक

पणजी: येथील एका नामांकित ज्वेलर्स शोरूमधील दागिने चोरून पसार झालेल्या कर्मचाऱ्याला पणजी पोलिसांनी (Goa Police) मध्य प्रदेशमध्ये जाऊन अटक केली व त्याला गोव्यात आणले. या कर्मचाऱ्याचे नाव विकास कुशवा (30) असून, त्याला आज न्‍यायालयापुढे उभे करण्‍यात येणार आहे. त्याच्याकडून चोरलेले 32.59 लाखांचे सर्व दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिली. कॅसिनोवरील जुगाराच्‍या व्यसनापोटी त्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.

मूळ ग्वालियर-मध्यप्रदेश येथील संशयित विकास कुशवा हा गेल्या काही महिन्यांपासून ज्वेलर्स शोरूममध्ये सेल्समन म्हणून कामाला होता. त्याने गेल्या शुक्रवारी (18 फेब्रुवारी) रात्री शोरूम बंद करण्यापूर्वी दागिने चोरले होते. त्यामध्ये 15.404 ग्रॅमची अंगठी, 17.953 ग्रॅमची पेंडंट असलेली सोनसाखळी, 59.663 ग्रॅमची सोनसाखळी, 63.518 ग्रॅमची सोनसाखळी, 72.124 ग्रॅमची सोनसाखळी तसेच 348 ग्रॅमच्‍या 23 सोन्याच्‍या नाण्‍यांचा समावेश होता. हे सर्व दागिने त्याच्याकडून ताब्यात घेण्यात पणजी पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना व उपअधीक्षक हरिश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही कारवाई केली.

ज्वेलर्स शोरूमच्या मालकाने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी भाड्याने एक फ्लॅट घेऊन दिला होता. संशयित विकास हासुद्धा इतर कर्मचाऱ्यांसोबत तेथे राहत होता. चोरी केलेल्या दिवशी तो फ्लॅटवर आला, मात्र रात्रीच्या वेळीच तो तेथून निघून गेला. ही माहिती इतर कर्मचाऱ्यांनी मालक धर्मेश कपूर यांना दिली व चोरीची शक्‍यता व्‍यक्त केली. त्यामुळे कपूर यांनी शोरूममध्ये जाऊन त्याची खातरजमा केली. आतमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विकास दागिन्यांची चोरी करताना कैद झाला. त्‍यामुळे त्‍यांनी शनिवारी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कॅसिनो जुगारावर उडवत होता पैसा

संशयित विकास नोकरीनिमित्त गोव्यात आला होता. त्याला कॅसिनो जुगाराचे व्‍यसन होते. पगाराचे पैसे तो जुगारावर उडवत होता. तेथे जॅकपॉट लागून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत होता. मात्र यश न आल्याने शोरूममधून दागिने चोरण्‍याचा बेत आखला, अशी कबुली प्राथमिक चौकशीत त्‍याने पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी अशा प्रकारे आवळल्‍या मुसक्‍या

पोलिसांनी संशयित विकासच्‍या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेणे सुरू केले. तो मध्य प्रदेशात रेल्वेने तेथे पसार झाला असावा असा तर्क काढून रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशय खरा ठरला. त्‍यानंतर पणजी पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना संशयिताचे छायाचित्र पाठवून ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार विकास हा मध्यप्रदेश येथे रेल्वे स्थानकावर उतरताच त्याला तेथील पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले. त्यापूर्वीच पणजी पोलिस पथक मध्य प्रदेशाला रवाना झाले होते. इंदोर येथील न्यायालयात ट्रान्झिट वॉरंट मिळवून त्याला गोव्यात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT