Goa POCSO Case Dainik Gomantak
गोवा

इन्स्टाग्रामवरची मैत्री अंगलट; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला!

Instagram Minor Assault Case Panaji: अत्याचाराचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता पाहता, या टप्प्यावर जामीन देणे ''घाईचे'' ठरेल, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी नोंदवले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: इन्स्टाग्रामवरून मैत्री करून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रथमेश वेर्णेकरचा जामीन अर्ज पणजी येथील ''फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट''ने (पॉक्सो) फेटाळून लावला आहे. कथित अत्याचाराचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता पाहता, या टप्प्यावर जामीन देणे ''घाईचे'' ठरेल, असे निरीक्षण विशेष न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी नोंदवले.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ९ मार्च २०२६ रोजी तिने आरोपीला पणजी मार्केटजवळ भेटण्याचे ठरवले. यावेळी आरोपीने तिला चहा पाजण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवरून म्हापसा येथे नेले. म्हापसा येथील एका हॉटेलमध्ये मुलीला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर त्याने तिला पुन्हा पणजी बसस्थानकावर सोडून दिले. पीडितेने या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली, त्यानंतर उत्तर गोवा महिला पोलीस स्थानकात ११ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपीची ओळख संशयास्पद आहे. पीडितेने कलम १८३ बीएनएसएस अंतर्गत दिलेल्या जबाबात ''हर्षद'' नावाच्या मुलाचा उल्लेख केल्याचा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला होता. न्यायालयाने नमूद केले की, हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आरोपी आणि पीडिता दोघांच्याही नावांची नोंद आहे, ज्यामुळे ते दोघेही त्या ठिकाणी एकत्र उपस्थित होते हे सिद्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT