Consensual Relationship Case Dainik Gomantak
गोवा

खोटा जबाब, बनावट आरोप आणि प्रियकराला तुरुंगाची हवा! लग्नासाठी बलात्काराच्या खोट्या तक्रारीचा 'ट्रॅप'? 'पोक्सो' कोर्टाचा मोठा निकाल

Consensual Relationship Case: आमच्या लग्नाला घरच्यांनी परवानगी द्यावी, या दबावामुळे मी लैंगिक अत्याचाराचा खोटा जबाब दिला होता. प्रत्यक्षात मी माझ्या मर्जीनेच त्याच्यासोबत गेले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: आमच्या लग्नाला घरच्यांनी परवानगी द्यावी, या दबावामुळे मी लैंगिक अत्याचाराचा खोटा जबाब दिला होता. प्रत्यक्षात मी माझ्या मर्जीनेच त्याच्यासोबत गेले होते. अशा पीडितेच्या धक्कादायक कबुलीनंतर पणजी येथील विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने १९ वर्षीय दीपक कुमार निषाद याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.

भारतीय न्याय संहिता कलम ६४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत दीपकवर बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले होते; मात्र पीडितेच्या साक्षीनंतर ते पूर्णपणे फोल ठरले. खटल्यातील पहिली साक्षीदार असलेल्या पीडितेने न्यायालयाला सांगितले की, १९ जून २०२५ रोजी तिने स्वतः दीपकला होंडा येथील हॉकी मैदानावर बोलावले होते. त्यानंतर दोघे सत्तरी, थिवी, म्हापसा, पणजी मार्गे अहमदाबादला गेले आणि तेथून पुढे नेपाळला रवाना झाले. अहमदाबादमधील एका हनुमान मंदिरात त्यांनी लग्न केल्याचेही तिने सांगितले.

दरम्यान, तपास अधिकारी ‘एलपीएसआय’ समिशा नाईक यांनी न्यायालयाला माहिती दिली की, तांत्रिक तपासाद्वारे या दोघांचा शोध घेण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पीडितेने स्वतः कबूल केले आहे की ती स्वेच्छेने गेली होती आणि तिने पोलिसांसमोर दिलेला अत्याचाराचा जबाब खोटा होता. त्यामुळे आरोपीविरुद्ध अपहरण किंवा लैंगिक अत्याचाराचा कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही.

...तरच होणार होते लग्न

पीडितेने स्पष्ट केले की, आमच्या गावात लैंगिक संबंधांची बाब समोर आल्यास पालक दोघांचे लग्न लावून देतात. माझ्या पालकांनी आमचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले होते, म्हणून मी न्यायालयासमोर लैंगिक अत्याचार झाल्याचा खोटा जबाब दिला होता. पीडितेने सुरुवातीलाच कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यास लेखी नकार दिला होता, जो न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT