Panaji Fish Market Relocation Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजी पालिकेने मासळी विक्रेत्यांसाठी उभारला मांडव, मंडपवाला झाला मालामाल; भरले 50 लाख भाडे

Panaji Fish Market Relocation: पणजी महानगरपालिकेने मासळी मार्केटजवळील जीर्ण इमारत पाडण्यासाठी मासळी विक्रेत्यांचे धेंपो हाऊसशेजारी पार्किंगमध्ये मंडप घालून व्यवसायासाठी स्थलांतर केले होते.

Sameer Panditrao

पणजी: पणजी महानगरपालिकेने मासळी मार्केटजवळील जीर्ण इमारत पाडण्यासाठी मासळी विक्रेत्यांचे धेंपो हाऊसशेजारी पार्किंगमध्ये मंडप घालून व्यवसायासाठी स्थलांतर केले होते. या मंडपासाठी सुमारे साडेचार महिन्यांसाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपयांचे भाडे मोजले आहे. त्या खर्चाला शुक्रवार, २० रोजी होणाऱ्या बैठकीत मंजुरी घेतली जाणार आहे.

लोखंडी खांब, पत्रे आणि बांबू लावून उभारलेले तात्पुरत्या शेडसाठी महानगरपालिकेने तीन टप्प्यांत भाडे मोजले आहे. सुरुवातीला २३ दिवसांसाठी मंडपाचे भाडे १८ टक्के जीएसटीसह मंडपधारकाने ९ लाख ४६ हजार ६४३ रुपये घेतले आहेत.

त्याशिवाय या मंडपवाल्याला मुदतवाढ दिली गेली. ही मुदतवाढ २५ दिवसांची राहिली. त्यासाठी महानगरपालिकेला बिलापोटी १० लाख २८ हजार ९६० रुपये मोजावे लागले.

बाजूला उभारल्या जाणाऱ्या शेडचे काम पूर्ण न झाल्याने मंडपवाल्याला पुन्हा मुदतवाढ मिळाली. ही मुदतवाढ ९० दिवसांची राहिली.

त्यामुळे मंडपवाल्याने बिलातून महानगरपालिकेला २० टक्के सूट दिली आणि बिल २० लाख ६३ हजार ४०५ रुपये एवढे दिले. म्हणजेच सुमारे साडेचार महिन्यांसाठी महानगरपालिकेला हा मंडप ४९ लाख ३९ हजार ८ रुपयांना पडला. या सर्वांत १८ टक्के जीएसटीचा समावेसश आहेच.

तर लाखो वाचले असते!

विशेष बाब म्हणजे एवढी मोठी रक्कम मोजण्याऐवजी स्वतः खर्च करून महानगरपालिकेने मंडप उभारला असता तर तो त्यांना परवडला असता आणि कायमस्वरूपी वस्तूही महानगरपालिकेकडे राहिल्या असत्या. त्यातून लाखो रुपये महानगरपालिकेचे वाचले असते. या बाबी जर-तरच्या; परंतु या सर्वातून मंडपवाला मात्र मालामाल झाला आहे. उद्या, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या खर्चाला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही, जरी घेतला तरी त्यावर पुढे काय होणार, हे सर्वांनाच माहीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

SCROLL FOR NEXT