Panaji Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

पणजी महापालिकेची पावसाळ्यापूर्वी नवी मोहीम

दैनिक गोमन्‍तकच्या बातमीचा इफेक्ट

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी महानगर पालिकेने शहरातील गटारांची स्‍वच्‍छता आणि दुरुस्‍तीचे काम हाती घेतले आहे. शहरातील पावसाळापूर्व कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्‍याचे वृत्त आज ता. 1 रोजी दै. गोमन्‍तकमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेने साफसफाईचे काम हाती घेतले आहे.

याबाबतची माहिती देताना महापालिकेचे अभियंता विवेक पार्सेकर यांनी सांगितले की, गटारांची स्‍वच्‍छता आणि झाडांच्‍या फांद्यांची छाटणी ही कामे वरचेवर केली जातात. पण पाऊस सुरू झाला की गटारे तुंबतात. यामुळे बऱ्याचदा गटारांतील पाणी रस्‍त्‍यावर येते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे पावसाळ्यापूर्वी लाद्या टाकून बंद केलेल्‍या मोठ्या गटारी पूर्णपणे स्‍वच्‍छ केल्‍या जातात. संपूर्ण वर्षभर यात साचलेला गाळ आणि माती काढून टाकली जाते.

शहरात अशी मोठी गटारे अनेक आहेत. यामुळे काहीवेळा कामास विलंब होतो. पण सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील, असे पार्सेकर म्‍हणाले. सध्या मांडवी हॉटेलसमोरील मोठी गटारे स्‍वच्‍छ केली जात आहेत. तसेच सांतईनेज परिसरातील हॉटैल शितल समोरील गटारांतील गाळ आणि माती काढली जात आहे.

पावसाळ्यात विशेषतः भरतीच्‍यावेळी मोठा पाऊस झाला तर शहरातील रस्‍त्‍यांवर पाणी साचते. तसेच गटारे तुंबतात. पण ओहोटी सुरू होताच सर्व काही सुरळित होते. तसेच वादळी पाऊस झाल्‍यास झाडाच्‍या फांद्या तुटून पडण्याचे प्रमाणही वाढते. यासाठी पालिकेच्‍यावतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वाळलेल्‍या तसेच धोकादायक असलेल्‍या फांद्या छाटून टाकतो.

गटारी तुंबणार नाहीत, यासाठी काळजी

मुख्य रस्‍त्‍यांच्‍या बाजूला असलेल्‍या झाडांची पाने, छोट्या-छोट्या फांद्या, माती, प्‍लास्‍टिक, बाटल्‍या आदींमुळे गटारी तुंबतात. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे येतात. शहरातील रस्‍त्‍यांवर मोठमोठ्या झाडांची पाने मोठ्या प्रमाणात पडतात. ती ठराविक वेळी काढली जातात. पण इतरवेळी आणि रात्रीच्यावेळी पडणारी पाने आणि फांद्या वाऱ्याने गटारात पडतात. यामुळे गटारे तुंबण्याचे प्रमाण वाढते. यासाठी महानगरपालिका नेहमी सतर्क असते. तसेच शहरातील गटारी तुंबणार नाहीत याची काळजी घेतली जाते, असेही पार्सेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

Mardol Mobile Tower: म्हार्दोळच्‍या क्रीडा मैदानावरील मोबाईल टॉवरचे काम तूर्त बंद, स्थानिकांचा विरोध; उपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT