Panaji Ashtami fair earnings
पणजी: अष्टमीच्या फेरीतून पणजी महानगरपालिकेने बंपर कमाई केली आहे. १५ ऑगस्टला सुरु झालेल्या या फेरीतून पालिकेने तब्बल १.१५ कोटी रुपयांचा महसूल गोळा केल. फेरीतून गोळा केलली पालिकेची ही आजवरची सर्वात मोठी कमाई आहे. दरम्यान, परवानगी नसताना पाच दिवस अतिरिक्त फेरी सुरु होती. पण, याबाबत आयुक्तांना मात्र कल्पना नसल्याची माहिती समोर आली आहे.
पणजी पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अष्टमीच्या फेरीतून १.१५ कोटी रुपयांची कमाई झाली. गेल्या वर्षी पालिकेला अष्टमीच्या फेरीतून १.१० कोटी रुपये मिळाले होते. १५ ऑगस्ट रोजी सुरु झालेली ही फेरी २६ ऑगस्ट रोजी समाप्त होणे अपेक्षित होते पण, त्यानंतर ५ दिवस फेरी विनापरवाना सुरु होती. ३१ ऑगस्ट रोजी फेरी समाप्त झाली.
पण, अतिरिक्त पाच दिवस सुरु असलेल्या फेरीबाबत आयुक्तांना कल्पना नव्हती अशी माहिती समोर आली असून, त्यांनी याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
पणजी अष्टमीच्या फेरीत ४०० स्टॉल उभारण्यात आले होते. स्टॉल धारकांना २६ ऑगस्टपर्यंत स्टॉलसाठी परवानगी होती पण, पालिकेने ऑगस्ट अखेरपर्यंत परवानगी दिल्याचा दावा करत ३१ ऑगस्टपर्यंत स्टॉल सुरु ठेवले. पण, पालिका आयुक्त क्लेन मादेरा यांनी हा दावा खोडून काढत, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. स्टॉलधारकांनी ३१ ऑगस्टपर्यंत स्टॉल सुरु ठेवल्याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे क्लेन म्हणाले.
फेरी कधी पर्यंत सुरु राहणार याबाबत स्टॉल धारकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. काही स्टॉल धारकांना फेरीचा अखेरचा दिवस कोणता आहे, याबाबत कोणतीच माहिती देण्यात आले नसल्याचे सांगितले, शिवाय पालिकेकडून देखील याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही, अशी माहिती स्टॉल धारकांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.