Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Panaji Tenants Income Certificate Issue: पणजी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या भाडेकरूंना मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा दाखला मिळविताना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या भाडेकरूंना मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला उत्पन्नाचा दाखला मिळविताना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरमालकांनी घरपट्टी थकविल्याने आवश्यक असलेले घरपट्टी भरण्याचे प्रमाणपत्र भाडेकरूंना सादर करता येत नसल्याने त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पणजी शहर परिसरात परराज्यातील अनेक कुटुंबे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांच्या मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असून, विविध शैक्षणिक सवलती किंवा योजनांसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाकडे उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक असते. हा दाखला मिळविण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करताना फ्लॅटमालक अथवा घरमालकाने घरपट्टी भरल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

घरमालकांनी अनेक महिन्यांपासून घरपट्टी भरलेली नसल्यास त्याचा थेट परिणाम भाडेकरूंवर होत आहे. काही घरमालकांकडून हजारो रुपयांचे नियमित भाडे घेतले जात असतानाही घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, भाडेकरूंना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी घरमालकांकडे विनंती करावी लागत आहे.

महानगरपालिकेच्या दृष्टीने घरपट्टी नियमितपणे भरणे ही घरमालकांची जबाबदारी आहे.

शिक्षणासाठी कागदपत्रांची गरज

मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असलेल्या कुटुंबांना घरमालकांच्या थकीत घरपट्टीचा फटका बसत आहे. त्यामुळे घरपट्टी थकविणाऱ्या घरमालकांमुळे भाडेकरूंना शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेने पर्यायी उपाययोजना करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT