stray cattle Dainik Gomantak
गोवा

Panaji News : बांबोळी परिसरात भटक्या गुरांचा उपद्रव

Panaji News : बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची बरीच गर्दी असते. या ठिकाणी विक्रेत्यांना गाळे बांधून देण्यात आले असले तरी सर्वजण या गाळ्यांचा वापर सामान ठेवण्यासाठी करून व्यापार मात्र पदपथावर करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, बांबोळी गोमेकॉ इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर भाजी-फळे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यातच तेथील जंक्शनवर भटक्या गुरे रस्त्यावर बसत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने या गुरांच्या अडथळ्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भटक्या गुरांची समस्येबाबत सांताक्रुझ पंचायतीकडून कोणतीच पावले उचलण्यात येत नसल्याने वाहन चालकांत नाराजी आहे.

सांताक्रुझ भागात दिवसा-रात्री भटकी गुरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. बांबोळी इस्पितळाच्या ठिकाणी असलेल्या जंक्शनवर तसेच या भागात ही भटकी गुरे ठाण मांडून बसलेली असतात.

यासंदर्भात पंचायतीच्या विरोधी पंचसदस्यांनी या भटक्या गुरांबाबतची समस्या मांडली होती व पंचायतीला कार्यवाही करण्यासाठी विनंती केली होती. मात्र अजूनही पंचायतीकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. या भटक्या गुरांना पकडण्यासाठी सरकारकडून पंचायतींना निधी दिला जातो मात्र त्याची उपयोग न केला जात नसल्याचा आरोप माजी उपसरपंच डॉमनिक परेरा यांनी केला होता.

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची बरीच गर्दी असते. या ठिकाणी विक्रेत्यांना गाळे बांधून देण्यात आले असले तरी सर्वजण या गाळ्यांचा वापर सामान ठेवण्यासाठी करून व्यापार मात्र पदपथावर करत आहेत. या ठिकाणी काही मोबाईल फास्टफूडची वाहने दिवसा-रात्री जंक्शनवरच उभी करून ठेवण्यात आलेली असतात.

या रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करून ठेवण्यात आलेली असतात व त्यातच ही भटकी गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीची कोंडी होते. या गुरांमुळे काही वाहन चालक चुकीच्या दिशेने येत असल्याने अपघाताचा संभव असतो. त्यामुळे सांताक्रुझ पंचायतीने या भटक्या गुरांना पकडण्यासाठी पावले उचलण्यात यावीत अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT