Panaji Mayor Rohit Monserrate Dainik Gomantak
गोवा

सात दिवसांचा थरारक ट्रेक! पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सर केले किलिमांजारो शिखर, ठरले भारतातील 'पहिले महापौर'!

Panaji Mayor Rohit Monserrate: पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी एक अभूतपूर्व कामगिरी केली. मोन्सेरात यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट किलिमांजारो यशस्वीरित्या सर केले.

Manish Jadhav

पणजी: पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी एक अभूतपूर्व कामगिरी केली. मोन्सेरात यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट किलिमांजारो यशस्वीरित्या सर केले. सात दिवसांच्या खडतर ट्रेकिंगनंतर त्यांनी ही मोहीम पूर्ण केली असून किलिमांजारो सर करणारे ते भारतातील पहिले महापौर ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल गोव्यासह देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, मोन्सेरात यांनी नुकतीच आपली ही साहसी मोहीम पूर्ण केली. सुमारे 5,895 मीटर (19,341 फूट) उंचीचा किलिमांजारो हा एक निष्क्रिय ज्वालामुखी असून त्याचे शिखर गाठणे हे कोणत्याही गिर्यारोहकासाठी एक मोठे आव्हान आहे. मोन्सेरात यांनी 7 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हे शिखर गाठले.

आपल्या या अनुभवाविषयी बोलताना मोन्सेरात यांनी सांगितले की, ''ही मोहीम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक होती. अत्यंत कमी तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि चढणीचा खडतर मार्ग यामुळे अनेक अडचणी आल्या. मात्र, दृढनिश्चय आणि योग्य तयारीमुळे हे आव्हान पेलता आले. या मोहिमेने मला जीवनातील अनेक गोष्टी शिकवल्या."

भारतातील पहिले महापौर

माऊंट किलिमांजारो सर करणारे रोहित मोन्सेरात हे भारतातील (India) पहिले महापौर ठरले, ही त्यांच्यासाठी आणि गोवा राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कामगिरीने शारीरिक तंदुरुस्ती आणि साहसाची आवड असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी अशा प्रकारची साहसी मोहीम फत्ते केली, याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी मोन्सेरात यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पणजी शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

किलिमांजारो शिखर

स्थान: टांझानिया, आफ्रिका

उंची: 5,985 मीटर (19,341 फूट)

शिखराचं नाव: Uhuru Peak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Ferry in Goa: गोव्याला देशातील पहिल्या रो-रो फेरीचा मान; रायबंदर-चोडण जलमार्गावर सेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Goa Road Accidents: गोव्यातील अपघात व बळी कमी होऊ शकतात, 'या' प्रक्रिया बंधनकारक करणे आवश्यक; Video

Ahmedabad Plane Crash: 'पायलटवर आरोप नको'; अहमदाबाद विमान अपघात अहवालातील दाव्यांवर पायलट संघटना आक्रमक

Goa Live News: राज्यात रो-रो फेरीचे उद्घाटन

Ganga Pujan: विठ्ठल, विठ्ठल! मुळगावात देवी केळबाई मंदिरात ‘गंगापूजन’ सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT