Panjim Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: महापौर-उपमहापौरांच्या निवडीचे वेध

Goa Politics: महिन्याचा अवधी: महिला उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा

दैनिक गोमन्तक

Goa Politics: पणजी महापौर-उपमहापौर निवड आता एक महिन्यावर आली आहे. मार्चच्या अखेरीस ही निवड होणार असल्याने यावेळी बदल होण्याची अपेक्षा अनेक नगरसेवकांना वाटत आहे. यावेळी महिलांना या पदावर संधी मिळावी, अशी अपेक्षा निवडून आलेल्या महिला नगरसेवकांना वाटत आहे.

महानगरपालिका निवडणुकीत म्हणजे 2021-22मध्ये आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप पुरस्कृत पॅनलने 30 पैकी 25 जागांवर विजय मिळविला. त्यानंतर काही महिन्यांत अपक्ष म्हणून निवडून आलेला नगरसेवकही मोन्सेरात यांच्या गोटात सामील झाला. त्यामुळे ही संख्या 26 वर पोहोचली.

स्वीकृत दोन नगरसेवक घेतल्याने ती 28 झाली आहे. परंतु पॅनलमधून निवडून आलेल्या 25 मध्ये 11 महिला नगरसेवकांचा सहभाग आहे. त्यातील कॅरिलिना पो यांच्यासारख्या माजी महापौर पुन्हा निवडून आल्या आणि त्यांच्याकडे अनुभवही आहे.

शिवाय अस्मिता केरकर या उपमहापौर राहिल्याने त्याही अनुभवी आहेत, परंतु इतर महिला नगरसेवक दोन ते तीनवेळा व काही प्रथमच निवडून आलेल्या आहेत.

दोन-तीनवेळा निवडून आलेल्या महिला नगरसेवकांना महापौर किंवा उपमहापौरपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, शेवटी शब्द बाबूश यांचाच असला तरी यावेळी पक्षीय पातळीवरून महिलांना संधी देण्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.

कारण ही निवड लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होत आहे. त्याशिवाय प्रथमच निवडून आलेल्या पुत्रास प्रेमापोटी सलग दोनवेळा महापौर केल्याने अनेकांमध्ये सुप्त असंतोष आहे.

आतापर्यंत महिलांना सत्तेची खुर्ची दूरच

महानगरपालिकेत सध्या सत्ताधारी गटाकडे महिलांमध्ये कॅरिलीना पो, शुभदा शिरगावकर, अस्मिता केरकर, मनीषा मणेरकर, दीक्षा माईणकर, लॉरेन डायस या अनुभवी नगरसेवक आहेत, तर वर्षा शेट्ये, शायनी चोपडेकर,

आदिती चोपडेकर, प्रांजल नाईक आणि सँड्रा कुन्हा या नवख्या नगरसेवक आहेत. त्यामुळे एवढी मोठी संख्या असतानाही महिलांना सत्तेची खुर्ची मिळत नाही आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करताही येत नाही, अशी स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

Laxmi Narayana Rajyog 2026: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या 3 राशींचं नशीब पालटणार; 'लक्ष्मी नारायण राजयोग' करणार धनवर्षाव!

Cricket Fixing: टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का! 'या' स्टार फलंदाजावर फिक्सिंगचा आरोप, 'ICC'कडून तत्काळ निलंबन

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

SCROLL FOR NEXT