Panaji Road Issue  Dainik Gomantak
गोवा

Panjim Road Issue : पणजी-मडगाव महामार्गाला भेगा ; अपघाताची शक्‍यता नागरिक त्रस्त

सांताक्रुझ येथील उड्डाणपुलावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. तसेच जीवाला धोका निर्माण झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Road Issue : तिसवाडी, राज्यात रस्त्यांची स्थिती खूपच वाईट झाल्याने वाहनचालक आणि वाहतूकदारांचे हाल होत आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्गासंदर्भात देखील अनेक तक्रारी येत आहेत.

आता तर पणजी-मडगाव महामार्गाला सांताक्रुझ येथील उड्डाणपुलावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे. तसेच जीवाला धोका निर्माण झाला आहे.

.यापूर्वी याच महामार्गाच्या बांबोळी येथील उड्डाणपुलावर देखील भेगा गेल्या पडल्‍या होत्या. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेला हा क्राँक्रीटचा रस्ता आपल्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी कुप्रसिद्ध आहे.

तसेच रस्ता समतल नसल्याच्या अनेक तक्रारी देखील आजही येत आहेत. महामार्गावर अनेक टप्प्यांमध्ये मूलभूत नियमांचे पालन न केल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर केल्या जात आहेत.

पणजी-मडगाव महामार्गाचे बांधकाम हे नियमांचे उल्लंघन करून झाले आहे. यात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून गुणवत्तेचे निरीक्षण न केल्याचे स्पष्ट होत आहे. दक्षता विभागाकडून याची चौकशी करावी. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

- मिलिंद प्रभू, रस्तातज्‍ज्ञ

या मार्गावरील भेगांमुळे रोज कामासाठी वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था झाल्याने ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट होते. शासनाने तातडीने रस्ता ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे.

- मेल्‍विन फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT