travelers Gomantak digital Team
गोवा

Panaji News : कदंब गाड्यांची अनुपलब्धता खासगी बसमालकांच्या पथ्यावर

वाहतूक महागली : विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी 15 हजार रुपये खर्च

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या शालेय मुलांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्याचा फायदा खासगी बसमालकांना होत आहे. त्यामुळे आता पणजीतून कुजिरापर्यंत खासगी बसने पाल्याला सोडायचे झाल्यास महिन्याकाठी 1,300 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच वर्षाकाठी 14 हजार 300 रुपये केवळ भाड्यापोटी पालकांच्या खिशातून जाणार आहेत.

कुजिरा येथे महत्त्वाच्या शिक्षण संस्थांच्या शाळांचे शहरातून स्थलांतर झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कदंब महामंडळाने आपल्या बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत, परंतु आता या बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. माध्यमिक शाळांमध्ये पाचवी ते सातवीपर्यंत बालरथाचा वापर होतो, परंतु सातवीतून विद्यार्थी आठवीत गेल्यानंतर त्यांना कदंब बस किंवा खासगी बसचा पर्याय स्वीकारावा लागतो. खासगी बसेसमध्येही मुलांची दाटीवाटी असते, तरीही बिनदक्तपणे खासगी बसधारक आपला व्यवसाय करीत असतात.

पणजीतून कुजिरा येथे कदंब बसेसचा वर्षभराचा पास काढल्यास सुमारे साडेतीन हजार रुपये मोजावे लागतात, परंतु खासगी बससेवा पालकांना घ्यावी लागली, तर पाल्यांसाठी महिन्याकाठी 1 हजार 300 ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. म्हणजेच शैक्षणिक वर्षाचे अकरा महिने पकडले तर पालकांना 14 ते 15 हजार रुपये केवळ बस भाड्यापोटी खर्च करावे लागत आहेत.

वेगळा पर्याय स्वीकारावा

कदंबच्या बसगाड्या विद्यार्थी संख्येवर सोडणे शक्य आहे. कुजिरा येथे सर्व शाळा साधारण एकाच वेळेत भरतात. त्यामुळे किमान इतर शाळांचे विद्यार्थीही संख्या पाहून कदंब बसची सोय होणे अपेक्षीत आहे.

कदंबच्या बसगाड्या सुरू करण्याच्या प्रक्रियेविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, बस उपलब्ध झाली तरच ती सुरू करता येऊ शकते. अगोदरच बसगाड्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे अनेक अडचणी असल्याचे त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. काही पालकांनी याबाबत वरील बसगाड्यांविषयीचा शाळा व्यवस्थापनाकडेही प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT