Panaji : साहित्यामुळे माणूस समृद्ध होतो : डॉ. सोमनाथ कोमरपंत

डॉ. सोमनाथ कोमरपंत : ‘आयएमबी’च्या अनुवाद कार्यशाळेला प्रारंभ
Dr. Somnath Komarpant
Dr. Somnath KomarpantGomantak Digital Team

पणजी : साहित्याच्या क्षेत्रात फार प्राचीन काळापासून आदान प्रदान होत आहे. त्यामुळे माणुस समृद्ध होतो. आपल्या राष्ट्राची वाङमयीन संस्कृती, तिच्यातील विविधता, प्रतिभा विलास अनुभवायचा असेल तर भारतीय अस्सल कृतीचे अवगाहन आवश्यक असते. अनुवाद प्रक्रिया हा वृत्तीगांभिर्याने पार पाडायचा शब्दव्यापार आहे, असे प्रतिपादन सव्यसाची समीक्षक तथा साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी येथे केले.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातर्फे (आयएमबी) सहा दिवसांच्या अनुवाद कार्यशाळेला नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी उद्‍घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोमरपंत बोलत होते. व्यासपीठावर निमंत्रक तथा प्रसिद्ध समीक्षक डॉ. किरण बुडकुले, डॉ. आशा गेहलोत, संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव गोरख मांद्रेकर उपस्थित होते.

कार्यशाळेत गोव्यातील प्रसिद्ध असे 26 अनुवादक आणि साहित्यात रुची असलेले २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमात इंग्रजी समीक्षेच्या पुस्तकाचा कोकणी अनुवाद, डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या क्षितिज समीक्षा ग्रंथाचा कोकणी अनुवाद व कोकणीतील 20 नामवंतांच्या कथांचा हिंदी अनुवाद असलेली तीन पुस्तके प्रकाशित केली जातील. शिवाय बालसाहित्य विद्यार्थी अनुवादित करतील.

प्रेरणेने अनुवादाचे कार्य करावे

आपले वेद, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत महाकाव्ये आणि अन्य अभिजात ग्रंथ हे मूळ संस्कृत भाषेतील आज निरनिराळ्या भाषांत अनुवादित झालेले आहेत. त्यामुळे संचिताचा धांडोळा घेता आला. भारतीय मन आणि वारसा समजून घेण्याच्या प्रेरणेने अनुवादाचे कार्य करावे, असे आवाहन डॉ. कोमरपंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com