Junta House Demolition Dainik Gomantak
गोवा

Junta House Demolition: पणजीतील 'जुन्ता हाउस'च्या पाडकामाला लवकरच सुरुवात, चोहोबाजूंनी पडद्याचे संरक्षण; इमारतीतील साहित्य हटवले

Junta House demolition Panaji: सरकारी कार्यालयांचा भरणा असलेली येथील मध्यवर्ती ठिकाणची सर्वांत उंच इमारत ‘जुन्ता हाउस’च्या पाडकामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सरकारी कार्यालयांचा भरणा असलेली येथील मध्यवर्ती ठिकाणची सर्वांत उंच इमारत ‘जुन्ता हाउस’च्या पाडकामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी इमारतीभोवती हिरव्या रंगाची कनात उभारून हा परिसर असुरक्षित असल्याचे त्याद्वारे सूचित करण्यात आले आहे.

जुन्ता इमारत आपत्ती व्यवस्थापनाने धोकादायक म्हणून घोषित केली होती. त्याशिवाय महानगरपालिकेनेही ही इमारत यापूर्वीच असुरक्षित जाहीर केली होती. अखेर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै २०२५ मध्ये जुन्ता हाउस व्यावसायिकांनी व सरकारी कार्यालयांनी खाली करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. परंतु काही व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यामुळे विलंब लागला आणि इमारत खाली करण्याची प्रक्रिया दोन वर्षे रखडत गेली. अखेर आपत्ती व्यवस्थापनाला इमारत जमीनदोस्त करण्याचे काम हाती घ्यावे लागले आहे. प्रशासनाने रविवारी इमारतीभोवती हिरव्या रंगाची कनात उभारली आहे. इमारत पाडण्याचे काम लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९६० च्या दशकात उभारलेली होती इमारत

इमारतीची संरचनात्मक मजबुती तपासण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्ती निश्चित करण्यासाठी साबांखाद्वारे ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये ‘नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग’चाही समावेश होता. १९६० च्या दशकात उभारलेली ही काँक्रिटची इमारत जीर्ण झाली होती. या जुंता हाऊससह सहा प्रमुख सरकारी इमारतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड (पूर्वीची नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे.

वैशिष्ट्ये

जेव्हा ही इमारत उभी राहिली, तेव्हा ती गोव्यातील सर्वांत उंच इमारत होती. ही इमारत १९६६ मध्ये उघडण्यात आली.

गोव्यातील सुरुवातीच्या मोजक्या लिफ्टपैकी ही एक होती. लोक लिफ्ट पाहण्यासाठी आणि तिचा अनुभव घेण्यासाठी येथे येत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

Bicholim: रुंदीकरण केलेल्या रस्त्यावर बेकायदा पार्किंग, डिचोलीतील प्रकार; 'सेतू संगम' ते पोलिस क्वार्टर्सपर्यंतच्या वाहतुकीस धोका

अनिल सामंतांनी राजभाषा विषय अभ्यासावा... 

ज्ञानेशकुमार आणि मतदारयाद्यांचे 'शुद्धीकरण'

खरी कुजबुज: साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?

SCROLL FOR NEXT