Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पत्रकारांनी नेहमी लिहीत राहावे, मार्गदर्शक व्हावे! गुरुदास सावळ

Panaji News : शरद तेंडुलकर यांच्‍या ‘सुचले ते’, ‘मनातलं’चे थाटात प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, ‘सामाजिक पातळीवर होणाऱ्या बदलांचे पत्रकार साक्षीदार असतात. त्‍यावर बेतलेले लेखन नेहमी दिशादर्शक ठरते. शरद तेंडुलकर यांची लेखणी त्‍याच पठडीतील आहे. ती प्रवाही व संवादी आहे. त्‍यांची पुस्‍तके नव्‍या पिढीस मार्गदर्शक ठरतील’, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ पत्रकार गुरुदास सावळ यांनी केले.

पाटो-पणजी येथील ‘गुज’च्‍या कार्यालयात शनिवारी ज्‍येष्‍ठ पत्रकार शरद तेंडुलकर यांच्‍या ‘सुचले ते’ व ‘मनातलं’ या दोन पुस्‍तकांचे थाटात प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून गुरुदास सावळ, प्रमुख अतिथी म्‍हणून माजी ज्‍येष्‍ठ संपादक वामन प्रभू, राही ‘प्रकाशन’चे वैभव फोंडेकर व्‍यासपीठावर उपस्‍थित होते.

सावळ पुढे म्‍हणाले, अनुभवसिद्ध पत्रकारांनी आपल्‍याकडील माहितीची ठेवा पुस्‍तकरूपात पुढील पिढीकडे हस्तांतरित करायला हवा. आपल्‍या लोकप्रिय ‘च्रकव्‍यूह’ सदराचे पुस्‍तक होत असल्यासंदर्भात त्‍यांनी घोषणा केली.

वामन प्रभू म्‍हणाले, दिसते ते टिपणे, त्‍याचा तौलनिक अन्‍वयार्थ काढणे व ते लोकांसमोर मांडणे ही प्रक्रिया निरंतर सुरू राहिली पाहिजे. लिहिणारे अधिकाधिक हात पुढे यावेत. शरद तेंडुलकर यांनी पुस्‍तक निर्मितीमागील प्रवास उलगडला.

पत्रकार किशोर नाईक गावकर यांनी

नेमक्‍या शब्‍दांत तेंडुलकर यांच्‍या लेखणीतील बलस्‍थाने विषद करत सामाजिक वास्‍तवावर परखड भाष्‍य केले. वैभव फोंडेकर, ज्‍येष्‍ठ पत्रकार गणपत राऊळ, शमी भौंसुले यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. पत्रकार विलास महाडिक, अरविंद धुरी, वासुदेव पागी, हृषिकेश आठवले, तेंडुलकर यांचे कुटुंबीय, साहित्‍यप्रेमी यावेळी उपस्‍थित होते. सूत्रसंचालन नीलेश करंदीकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

SCROLL FOR NEXT