Educational Research Training Dainik Gomantak
गोवा

Panaji News : उच्च शिक्षण संचालनालयाचा पुढाकार; 433 प्राध्यापकांना संशोधनात्मक प्रशिक्षण

34 विषयांतर्गत प्रशिक्षण देणारा पहिलाच उपक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : कोणतीही शिक्षण व्यवस्था अधिक विकसित करण्यासाठी या व्यवस्थेतील शिक्षक ही अधिक सक्षम असायला हवेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी उत्साही आणि सक्षम शिक्षक निर्माण झाले पाहिजेत. ही गरज ओळखून उच्च शिक्षण संचालनालयाने गोवा राज्यातील 433 प्राध्यापकांना त्यांच्या संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘एनहंसिंग फायनल इयर स्टुडंट प्रोजेक्ट्स’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत नुकतेच संशोधनात्मक प्रशिक्षण देण्यात आले.

हा कार्यक्रम गोवा स्टेट हायर एज्युकेशन कौन्सिल, गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशन आणि गोवा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षण संचालनालयाद्वारे नुकताच गोवा विद्यापीठात झाला. यामध्ये संपूर्ण राज्यातील पीएचडी नसलेल्या; पण सेवेत पूर्णवेळ असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापकांना संशोधनात्मक प्रशिक्षण दिले.

महाविद्यालयीन स्तरावर तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी विषय कसे द्यावेत, विषयांचा शोध कसा घ्यावा,संदर्भांचा शोध कसा घ्यावा, स्वाध्यायाचे रूपांतर संशोधनात्मक पेपरमध्ये कसे करावे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकामध्ये ते प्रसिद्ध कसे करावेत, त्यासाठी कोणत्या क्षमता विकसित करणे गरजेचे आहे, आदी विषयांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

34 शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांचा सहभाग

या कार्यशाळेत राज्यातील 34 उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कला, विज्ञान, वाणिज्य, संगीत, कायदा यांसारख्या विद्याशाखांमधील 34 विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

अनेकांचा सहभाग

आयआयटी गोवा, बिट्स गोवा,दिल्ली विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद आणि गोवा राज्य संशोधन फाऊंडेशन मधील तज्ज्ञांसह प्रतिष्ठित संस्थांमधील नामवंत तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या तज्ज्ञांमध्ये प्रा.शरद सिन्हा, प्रा. के. ए. गीता, प्रा. ए. के. मिश्रा, प्रा. रीना चेरुयवलथ, प्रा. पूजा गोयल, डॉ. एव्हेलिनो डी’कोस्टा, डॉ. नारायण परब, डॉ. अपर्णा लोलयेकर, प्रा. विठ्ठल तिळवी, प्रा. नियान मार्शेन, डॉ. महेश माजिक आणि प्रा. एम. के. जनार्थनम यांचा समावेश होता.

संशोधनासाठी पोषक वातावरण : तिळवी

अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे राज्यात संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. सहभागींच्या भक्कम सकारात्मक अभिप्रायाच्या आधारे, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमने गोव्याला नॉलेज-हब बनवण्यासाठी एक मजबूत पाया घातला आहे, असे गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेतील संशोधन, विकास आणि नवोपक्रम केंद्राचे प्रा. डॉ. विठ्ठल तिळवी म्हणाले.

भविष्यातही अशाच प्रशिक्षणावर भर देणार - माजिक

कार्यक्रमाचे समन्वयक, डॉ. महेश माजिक म्हणाले की, अशा अनोख्या उपक्रमाचा दीर्घकाळ प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातील कार्यशाळा शिस्तबद्ध-विशिष्ट प्रशिक्षण सत्रांवर भर देतील.

राज्यातील अशा प्रकारचे हे पहिले फॅकल्टी संशोधन प्रशिक्षण आहे, जेथे 34 उच्च शैक्षणिक संस्थांमधून 433 प्राध्यापकांना संगीत, नाटकापासून कायदा आणि शिक्षणापर्यंतच्या 34 विविध विषयांमध्ये, संशोधन करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. आम्ही गोवा राज्यात जागतिक दर्जाचे संशोधक विकसित करण्याचा पायंडा पाडत आहोत.

- प्रा. एम. के. जनार्थनम अध्यक्ष, गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT