Gauri Achari Murder Case
Gauri Achari Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case : गौरीचे वृद्ध पिता करताहेत पुरावे गोळा; पोटच्‍या पोरीला न्‍याय मिळावा यासाठी लढा सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Gauri Achari Murder Case :

पणजी, दोन वर्षांपूर्वी जुने गोवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या डॉ. गौरी आचारी खूनप्रकरणाला आज रविवारी २३ जून रोजी दोन वर्षे उलटली. या प्रकरणी न्यायालयीन लढा सुरू आहे.

संशयित गौरव बिद्रे याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी डॉ. गौरीचे वडील अनिल आचारी हे गेली दोन वर्षे प्रबळ पुरावे गोळा करण्‍यात व्‍यस्‍त आहेत. आपल्‍या प्रयत्नांना न्यायालयात यश तसेच पोटच्‍या पोरीला न्‍याय मिळेल, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.

वृद्धापकाळाकडे झुकलेले अनिल आचारी यांची गौरी ही मोठी सहारा होती. आजही आईवडिलांना तिची पावलोपावली आठवण येते. ज्या ठिकाणी संशयिताने गौरीवर गाडीत हल्ला केला, तेथील इमारतीतील फ्लॅट सोडून आता आचारी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले आहे.

दुसरीकडे उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज संशयिताच्या वकिलाने मागे घेतला. त्यामुळे आता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होणार असून, २६ जून ही तारीख निश्‍चित झाली आहे.

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी की, गौरीच्या आईने २४ जून २०२२ रोजी जुने गोवा पोलिस स्थानकात गौरी गायब असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी अनिल आचारी व त्यांच्या पत्नीने गौरव याच्‍यावर संशय व्यक्त केला होता. तत्पूर्वी २३ जून २०२२ रोजी गौरवने खोर्ली येथील आचारी राहत असलेल्या इमारतीच्या फ्लॅटजवळील कार पार्किंगच्या ठिकाणी कारमध्ये बॉनिटवर गौरीचे डोके आपटले होते. त्यानंतर तिचा मृतदेह कदंब बायपास महामार्गापासून जवळच्या जंगलात टाकला होता.

पोलिसांनी संशयितास खाक्या दाखविल्यानंतर गौरीचा खून केल्याचे गौरवने कबूल केले होते. खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात सरकारकडून गौरीची गॅझिटेड नियुक्ती झाली होती. सूक्ष्मजीवशास्त्राचे ती प्राध्यापक होती. सर्बियाला एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी रवाना होण्याच्या एक दिवस अगोदरच तिची हत्या झाल्याने राज्यात खळबळ उडाली होती.

मुंबईत महिलेशी केले होते गौरवने अश्‍लील वर्तन

खुनाच्या घटनेनंतर आजपर्यंत अनिल आचारी हे संशयित गौरवविरोधात जेवढे पुरावे गोळा करता येतील, तेवढे गोळा करत आहेत. त्यासाठी त्‍यांनी संशयित राहत असलेली सर्व ठिकाणे पालथी घातली आहेत. यावेळी त्यांना संशयित गौरव याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत गौरवला एका महिलेशी अश्‍लील वर्तन केल्याबद्दल २०१९ मध्ये अटक झाली होती.

अलिशान वाहनाद्वारे महिलांना ओढायचा जाळ्‍यात

गौरव आणि त्‍याची पत्नी बिना हिने मुंबईतील चार बँकांची फसवणूक केल्याचे पुरावे हाती लागले आहेत. तरीही गोव्यात येऊन त्यांनी एचडीएफसी बँकेतून १९ लाख रुपयांचे कर्ज घेऊन अलिशान वाहन खरेदी केले. याच वाहनाद्वारे संशयिताने आणखी तीन महिलांना आपल्या मोहजालात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचेही पुढे आले आहे. पोलिसांनी त्यांचे जबाब घेऊन पुरवणी आरोपपत्राबरोबर ते जोडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transport Minister Mavin Gudinho: क्षेत्रफळाच्या तुलनेत जास्त अपघात,अनेकजण मृत्युमुखी; रस्ते पाहणीसाठी तज्ज्ञ पाठवा

Goa Politics: काँग्रेस कार्यालयासमोरच राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Goa DGP: गोव्यात येण्याची गोलचा यांची इच्छा नाही; अन्य अधिकाऱ्यांच्या नावाचा शोध सुरू

Goa BJP: भाजप मुख्यालयाची पायाभरणी जे. पी. नड्डा यांच्या हस्ते

Goa Police: केसांना धरून ओढले, बूट चाटायला लावले, लाथांनी मारहाण केली!

SCROLL FOR NEXT