Haihaya King Ruled Goa: ऐतिहासिक गोव्यावर होती हैहय राजघराण्याची सत्ता; नवी माहिती प्रकाशात

Haihaya King Ruled Goa: पर्येतील दगडी स्तंभावरील लेखाचे संशोधकांकडून वाचन
Haihaya king And The inscription was found in the Bhumika temple at Sattari, Paryem village, north Goa, in 1993
Haihaya king And The inscription was found in the Bhumika temple at Sattari, Paryem village, north Goa, in 1993Dainik Gomantak

Haihaya King Ruled Goa

ख्रिस्तानंतरच्या चौथ्या किंवा पाचव्या शतकात पुराणामध्ये उल्लेख असलेल्या हैहय राजघराण्याची गोव्यावर सत्ता होती, अशी नवी माहिती पुरातत्वीय अभ्यासातून पुढे आली आहे. (Haihaya Kingdom)

उडुपी येथील पुरातत्व संशोधक तथा निवृत्त सहयोगी प्राध्यापक टी. मुरुगेशी (Udupi-based historian T. Murugeshi) यांनी पर्ये येथील श्री भूमिका मंदिरासमोरील एका दगडी स्तंभावरील शिलालेखाचे वाचन करून हा निष्कर्ष काढला आहे. (Haihaya king ruled over Goa)

ब्राह्मी लिपीतील; परंतु संस्कृत भाषेतील (Sanskrit and Brahmi script) या शिलालेखावर ‘धर्म यज्ञ’ नावाच्या हैहय राजाचा उल्लेख आहे, ज्याने आपल्या सैन्यासह यज्ञ केला, असे शिलालेखात म्हटले आहे. दोन ओळींच्या या शिलालेखाचा अर्थ आता उलगडल्याने ही नवी माहिती प्रकाशात आली आहे.

मुरुगेशी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले, की इतिहास अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या निमंत्रणावरून ते अलीकडेच गोव्यात आले होते. त्या दौऱ्यात त्यांनी या शिलालेखाचे वाचन केले. शिलालेखाच्या अलीकडील वाचनाने गोव्यावर राज्य करणाऱ्या पूर्वीच्या अज्ञात राजवंशांवर प्रकाश टाकला आहे.

पुराणात उल्लेखिलेल्या पाच कुळांचा एक प्राचीन समूह आहे. त्यात हैहय, विटीहोत्र, शर्यता, भोज, अवंती आणि तुंडिकेरा कुळांचा समावेश होतो. त्यापैकी हैहय राजघराण्याचे गोव्यावर राज्य होते, ही मोठी बाब आहे. गोव्याचे अस्तित्व आणि वास्तुशास्त्र याचा शोध त्याआधारे घेता येतो. गोव्यावर भोजांची सत्ता होती, याचा इतिहासात उल्लेख आहे; पण हैहय घराणे हे गोव्याच्या ज्ञात इतिहासासाठी नवे आहे.

संस्कृत भाषेतील शिलालेख ब्राह्मी लिपीत

तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना हा शिलालेख आढळला होता. तत्कालीन पुरातत्‍व संचालक पी. पी. शिरोडकर यांनी त्या शिलालेखाचे वाचन करून त्याविषयी एक छोटा लेख ‘नवे पर्व’ या सरकारी नियतकालिकात प्रसिद्ध केला होता. त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला होता, हे पुन्हा त्या शिलालेखाचे वाचन केल्यावर लक्षात आले आहे. शिलालेख ब्राह्मी लिपीत असला तरी तो संस्कृत भाषेत आहे.

अभ्यासकांच्या योगदानाची दखल :

प्रा. मुरुगेशी यांनी शिलालेखाचे नवीन वाचन उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातील एपिग्राफीचे संचालक डॉ. मुनिरथनम रेड्डी यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी राजेंद्र केरकर, अमेय किंजवडेकर, चंद्रकांत औखले आणि विठोबा गावडे यांच्या योगदानाचीही दखल घेतली आहे.

Haihaya king And The inscription was found in the Bhumika temple at Sattari, Paryem village, north Goa, in 1993
Goa Police: गोवा पोलिसांना चकवा, उत्तर प्रदेशातून अटक केलेला आरोपी मुंबई विमानतळावरुन फरार

पर्ये येथील शिलालेख कदाचित पश्चिम किनारपट्टी प्रदेशातील या विषयावरील एकमेव असू शकतो. १९९३ मध्ये त्या शिलालेखाचे योग्य वाचन न झाल्याने त्याची माहिती समोर आली नव्हती. शिलालेख वाचनासाठी योग्य प्रकारे ठसा घ्यावा लागतो. यातून गोव्याच्या इतिहासाचे वेगळे पैलू समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या संरक्षण व जतनाची गरज आहे.

- डॉ. नंदकुमार कामत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com